कराडात प्रीतीसंगमामध्ये बुडून मूलाचा मृत्यू; घाटावरील व्यावसाय बंद ठेवून श्रध्दांजली...
कराडात प्रीतीसंगमामध्ये बुडून मूलाचा मृत्यू; घाटावरील व्यावसाय बंद ठेवून श्रध्दांजली...
कराड दि.27-(प्रतिनिधी) येथिल कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमात आज एका मूलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास उकाराम कूंभार-प्रजापती (वय 17) असे या मूलाचे नाव आहे. हा मूलगा आपल्या कुटूंबासह आज रात्री मूळगावी राजस्थानला जाणार होता. त्याच्या मृत्यूनंतर कृष्णा घाटावरील सर्व हातगाडा व्यावसायिकांनी आपली दूकाने बंद ठेवून श्रध्दांजली वाहिली.
आज सकाळी कैलास हा प्रीतीसंगमावर आंघोळीसाठी गेला होता.मात्र त्याला पोहण्यास येत नसल्याचे तेथिल नागरिकांनी सांगितले. कैलास नदीपात्रात गेल्यानंतर तो गाळात अडकल्याचे एका लहान मुलीने तेथे आंघोळीसाठी आलेल्या नागरिकांना सांगितले. यावेळी अनेकांनी पात्रात उड्या घेत कैलासला बाहेर काढून काॅटेज हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र कैलासचा मृत्यू झाला. कैलास याचे वडील उकाराम हे गेली अनेक वर्षे कराडात राहतात. त्यांचा घाटावर वडापाव, भेळचा गाडा संपूर्ण कूटूंब चालवत होते.राजस्थानला घरगूती कार्यक्रमासाठी कूंभार कूटूंब आज रात्री जाणार होते. र्दूदैवाने कैलासचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊनचे कूंभार कूटूंबिये राजस्थानला रवाना झाले.या घटनेने कृष्णा घाटावर हळहळ व्यक्त होत होता.कैलास हा सर्वांच्या परिचयाचा होता.
बुलंद व स्वराज्य गणेश मंडळ व कृष्णामाई घाट व्यावसायिक मित्र मंडळाच्यावतीने ही श्रध्दांजली वाहण्यात आली.

Comments
Post a Comment