राज्यात 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; 157 जण झाले कोरोनामुक्त......
जिल्ह्यात आज ही बाधिताची वाढ नाही...
कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात 5 व्या दिवशी ही एका ही बाधिताची नोंद झाली नाही. जिल्ह्यात काल 113 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एक ही रुग्ण नाही.
एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 544
एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230
एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854
एकूण मृत्यू-6 हजार 683
सध्या उपचारार्थ रुग्ण-0
राज्यात 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
महाराष्ट्रात आज 165 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 961 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 157 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत 90, पुण्यात 34, ठाण्यात 21 रुग्णांची वाढ झाली.राज्यात आज 2 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेलीआहे.
भारतात गेल्या 24 तासात 3 हजार 303 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या देशात 16 हजार 980 रुग्ण ॲक्टिव आहेत.
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत #कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोनावर चर्चा झाली . आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, सरकार पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही. मास्कचा वापर न केल्यास दंड ही ठोठावण्यात येणार नाही. नागरिकांनी मात्र सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन टोपे यांनी केले.

Comments
Post a Comment