कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात...
कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात...
देशभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञांचा सहभाग; अत्याधुनिक उपचार प्रणालीवर चर्चा....
कराड, दि. 23: हृदयरोगावरील उपचारांचे बदलते तंत्रज्ञान आणि नवी आव्हाने या विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यासाठी कराड येथे कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हृदयरोगशास्त्र परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत देशभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, सुप्रसिद्ध कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. सी. नरसिंम्हन, वरिष्ठ इंटरव्हेंशन कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी. के. शास्त्री, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनीस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. सोमनाथ साबळे होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे आजार जडू लागले आहेत. अलीकडे अनेक ठिकाणी लक्ष्याधारित कामकाजामुळे हृदयावर ताण येऊन, हृदयविकारासारखे आजार जडत आहेत. अशा रुग्णांवर नवतंत्रज्ञानाचा वापर करुन, उच्चदर्जाचे उपचार कसे होतील, याची काळजी हृदयरोग तज्ज्ञांनी घेणे गरजेचे आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्वांना दर्जेदार उपचार देण्याचे व्रत आम्ही जपले असून, अत्याधुनिक साधनांनी व यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली ‘कृष्णा’ची कॅथलॅब रुग्णसेवेसाठी सदैव कटीबद्ध आहे.
अशा परिषदांमधून मिळणारे ज्ञान महत्वपूर्ण असून, त्याचा रुग्णांना अधिकाधिक लाभ निश्चितच होईल, असे प्रतिपादन प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे यांनी यावेळी केले.
कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांनी प्रास्तविक केले. डॉ. विजयसिंह पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, या दोनदिवसीय परिषदेत सुप्रसिद्ध कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. सी. नरसिंम्हन, वरिष्ठ इंटरव्हेंशन कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी. के. शास्त्री, हैद्राबाद येथील अपोलो टेलिरेडिओलॉजी इंटरनॅशनलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. एम. उमा, ए.आय.जी. हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. राजीव मेनन, ‘कॅथलॅब’चे संचालक डॉ. अनुज कपाडिया, सहसंचालक डॉ. स्वरुप भराडी, डॉ. सचिन यळगुड्री, अमेरिकेतील सेंन्ट्रा हेल्थकेअरमधील वैद्यकीय संचालक डॉ. अमित बडिये यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment