राज्यात 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; 174 जण कोरोनामुक्त.....
जिल्ह्यात आज ही बाधिताची वाढ नाही...
कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी एका ही बाधिताची नोंद झाली नाही. जिल्ह्यात काल 187 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एका ही रुग्ण नाही.
सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे.
एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 431
एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230
एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854
एकूण मृत्यू-6 हजार 683
सध्या उपचारार्थ रुग्ण-0
राज्यात 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
महाराष्ट्रात आज 186 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 955 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 174 जण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत 563, पुण्यात 219, ठाण्यात 76 उपचारार्थ रुग्ण आहेत
भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 483 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या देशात 15 हजार 636 रुग्ण ॲक्टिव आहेत.
राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा राज्य सरकारचा विचार....
Comments
Post a Comment