अमोल मिटकरींचे आक्षेपार्ह वक्तव्याचा कराडात निषेध; ब्राम्हण समाजाच्यावतीने पोलिसात निवेदन...

 


अमोल मिटकरींचे आक्षेपार्ह वक्तव्याचा कराडात निषेध; ब्राम्हण समाजाच्यावतीने पोलिसात निवेदन...

कराड दि.22 (प्रतिनिधी) अमोल मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था व कराड मधील सर्व ब्राह्मण संघटना यांनी एकत्र येऊन मिटकरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांच्या गून्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसात निवेदनाद्वारे केली आली आहे.याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना देण्यात आले आहे.

यावेळी सर्व ब्राह्मण संघटना व त्यांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर, सचिव ओंकार आपटे, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, संचालक अरुण प्रभुणे, उपाध्यक्ष विकास देशपांडे, सौ विनिता पेंढारकर, मल्हारी उमराणी, माधव गिजरे, संदीप भागवत , शरद हरदास, श्रीकांत ढवळे, राजाभाऊ जाखलेकर आदी समाजबांधव उपस्थित होते. या निवेदनावर समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था कराड, चित्तपावन ब्राह्मण संघ कराड, बहुभाषिक ब्राह्मण संघ, आगशिवनगर, बहुभाषिक ब्राह्मण संघ, विद्यानगर, ब्राह्मण बहुउद्देशीय चॅरिटेबल फौंडेशन श्र्संहिता स्वाहाकार समिती,वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळाचे सदस्य ही यावेळी उपस्थित होते.

पोलिसात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आ. अमोल मिटकरी यांनी दिनांक १९ एप्रिल २०२२ या दिवशी सांगली येथील पक्षाच्या जाहीर सभेत मा. ना. जयंत पाटील,ना. धनंजय मुंडे यांचेसह असंख्य लोकांचे उपस्थितीत जाहीरपणे वक्तव्य करताना हिन्दू धर्मियांचे श्रध्दा स्थान असलेल्या रामभक्त हनुमान (मारुती) स्तोत्र म्हणताना मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा याचे मिश्रित अभद्र भाषेत टिका टिप्पणी करताना हिन्दू देवतेचा व श्रध्देचा जाणीवपूर्वक अवमान करुन जाती धर्मात तेढ वाढवून वितुष्ट निर्माण केले आहे.

याशिवाय  या महाशयांनी परंपरागत हिन्दू विवाह पध्दतीवर टीका करताना " कन्यादान " या हिन्दू संस्कार पध्दतीवर गलिच्छ व द्वेषमूलक टीका केली आहे. हिन्दू धर्म पध्दती प्रमाणे मुलीचे (कन्येचे) वडील मुलाचे (नवरदेवाचे) वडिलांकडे कन्यादान करुन मुलीचा (कन्येचा) सांभाळ करण्याचे सांगतात पण या महाशयांनी या हिंदू धर्मातील संस्काराचे विधीवर खोटी व गलिच्छ बेताल टीका करुन हिन्दू धर्मिया मध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेले आहे. वास्तविक या कोणत्याही विधीशिवायही प्रेम विवाह होतच असतात पण हिन्दू धर्मियांचे संस्काराबद्दल बेताल व गलिच्छ टीका करुन हिन्दू धर्मियांच्या भावना दुखवून   ठेच पोहचविली आहे. व जाणीवपूर्वक  तेढ निर्माण केली आहे.

या शिवाय कोणत्याही विवाह प्रसंगी " मम भार्या समर्पित " असे वाक्य कोणताही पुरोहित वा ब्राह्मण कोणत्याही विवाह प्रसंगी उच्चारत नाहीत. पण या महाशयांनी स्वतः हे ऐकल्याचे व नवर देवाला कानात सांगितल्याचे मोघमपणे जाहीर वक्तव्य  केले. पण हे कोणत्या मित्राचे लग्नात कोणत्या गांवात कोणत्या पुरोहित, ब्राह्मण वा महाराजानी असे म्हणले याविषयी कांहीही न सांगता मोघमपणे समाजात तेढ वाढविण्यासाठीच फक्त हे वक्तव्य केले आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.

या सभेत ना. जयंत पाटील,ना. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्यातील शासनातील मंत्री महोदयांनी हजर असतानाही निषेध केलेला नाही वा कारवाई करण्याचे आदेश दिलेले नाहीत. उलट या वक्तव्यास हसून दाद दिलेली आहे. म्हणजेच या शासन प्रतिनिधीचा या हिन्दू धर्मात तेढ निर्माण करण्यास सहमती आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे.

सबब आपणास विनंती कि, या सांगली येथील भाषणाची विविध फेसबूक वा व्हाॅट्सअप ग्रूपवर आलेली व्हिडिओ क्लिप संबंधीत पोलीस स्टेशनकडून तपासून घेवून संबंधीत अमोल मिटकरी, व सदर सभा आयोजक आणि सदर सभेत हजर राहून कोणतिही कारवाई न करता या तेढ निर्माण करणा-या वक्तव्यास दाद देणा-या शासन प्रतिनिधी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहितेनुसार उचित कारवाई त्वरीत करावी.समाजात तेढ निर्माण करणारावर तातडीने कारवाई केली जावी हीच नम्र विनंती.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक