खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नळ योजनेसाठी 35 गावांना 26 कोटी 63 लक्ष निधी

 


नळ योजनेसाठी 35 गावांना 26 कोटी 63 लक्ष निधी....

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर....

कराड दि.22 (प्रतिनिधी) खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघातील 35 गावातील अस्तीत्वातील नळ पाणी पुरवठा योजनांना सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामांसाठी  26 कोटी 63 लक्ष 75 हजाराचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खा.पाटील यांच्या प्रयत्नातून सदर गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.

कराड तालुक्यातील कोणेगाव येथे अस्तीत्वातील नळ पाणीपुरवठा योजनेचे सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामासाठी 23 लक्ष 87 हजार,

म्हासोली येथे अस्ती. न.पा.पु.योजनेचे सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे 1 कोटी 88 हजार

नवीन कवठे येथे योजनेसाठी 60 लक्ष 22 हजार,

यणपे-शेवाळवाडी (चोरमारवाडी) येथे योजनेसाठी 67 लक्ष 68 हजार,

अंधारवाडी येथे योजनेसाठी 10 कोटी,

चिंचणी येथे योजनेसाठी 20 लक्ष 16 हजार,

तासवडे येथे योजनेसाठी 60 लक्ष 68 हजार,

कोळेवाडी येथे योजनेसाठी 24 लक्ष 88 हजार,

कळंत्रेवाडी येथे योजनेसाठी 59 लक्ष 21 हजार,

साजुर येथे योजनेसाठी 32 लक्ष 68 हजार,

पाटण तालुक्यातील म्हावशी व गुजरवाडी येथे योजनेसाठी 4 कोटी 44 लक्ष 42 हजार,

चौगुलेवाडी ( आचरेवाडी, कोळगेवाडी, मुटलवाडी) येथे योजनेसाठी 90 लक्ष 63 हजार,

धायटी येथे योजनेसाठी 31 लक्ष 50 हजार,

डांगीष्टेवाडी येथे योजनेसाठी 19 लक्ष 26 हजार,

विरेवाडी येथे योजनेसाठी 26 लक्ष 47 हजार,

केळोली येथे योजनेसाठी 66 लक्ष,

तोंडोशी येथे योजनेसाठी 36 लक्ष 18 हजार,

बनपुरी येथे योजनेसाठी 1 कोटी 97 लक्ष 51 हजार,

काहीर येथे.योजनेसाठी 50 लक्ष 30 हजार,

आटोली येथे योजनेसाठी 1 कोटी 6 लक्ष 20 हजार,

पाडळोशी येथे योजनेसाठी 43 लक्ष,

गलमेवाडी येथे योजनेसाठी 93 लक्ष 37 हजार,

सातर येथे योजनेसाठी 62 लक्ष 81 हजार,

लोटलेवाडी (काळगाव) येथे योजनेसाठी 22 लक्ष,

रूवले येथे योजनेसाठी 55 लक्ष 77 हजार,

गोषटवाडी येथे योजनेसाठी 40 लक्ष 82 हजार,

विहे येथे योजनेसाठी 75 लक्ष 82 हजार,

उरूल येथे योजनेसाठी 51 लक्ष 40 हजार,

नारळवाडी येथे योजनेसाठी 33 लक्ष 94 हजार,

घाणव येथे योजनेसाठी 37 लक्ष 47 हजार,

वाई तालुक्यातील चांदक येथे योजनेसाठी 79 लक्ष 32 हजार,

खटाव तालुक्यातील विसापुर येथे योजनेसाठी  1 कोटी 98 लक्ष 62 हजार,

कोरेगाव तालुक्यातील अंबवडे सं वाघोली येथे योजनेसाठी 1 कोटी 3 लक्ष 84 हजार,

बोरगांव येथे योजनेसाठी 94 लक्ष 52 हजार,

सातारा तालुक्यातील धनगरवाडी (निगडी) येथे योजनेसाठी  42 लक्ष 70 हजार,

सारखळ येथे योजनेसाठी  31 लक्ष 40 हजार

असे एकूण 26 कोटी 63 लक्ष 75 हजार एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती खा.पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. हा निधी मंजूर झाल्याने सदर गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरच सुरु होणार आहेत. जल जीवन मिशननुसार ग्रामिण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास केंद्र शासन कटिबद्ध असून राज्य शासनाच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. त्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघातील कामे कार्यान्वित करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांचेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक