पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड.....

व्ही.एस.आय.च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ना. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करताना संचालक सुरेशराव माने, सौ.लक्ष्मी गायकवाड, मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील (बाबा) आदी...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची व्ही.एस.आय च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड;सह्याद्रि'च्या वतीने अभिनंदन...

कराड दि.26-महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे, त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संचालक सुरेशराव माने (रा.चरेगाव) यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन ना.बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कामकाज सुरू असून, राज्यातील साखर उद्योगाला या संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते, त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखाने यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून नव - नवीन ऊसांच्या जाती तयार करण्यासंबंधी संशोधन केले जाते, तसेच हेक्टरी उत्पादन वाढविणे, उस शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, पाणी व खतांचा योग्य वापर, उस तोडणी कार्यक्रम आदि बाबत शेतकरी व साखर कारखान्यांना मार्गदर्शन केले जाते.

यापूर्वी ना. बाळासाहेब पाटील यांची 2002 आणि 2007 साली सलग दोन वेळा व्ही.एस.आय.च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली होती. तिसऱ्यांदा झालेल्या निवडीबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन सौ लक्ष्मी गायकवाड, संचालक सर्वश्री मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील (बाबा), दत्तात्रय जाधव, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, अविनाश माने, रामचंद्र पाटील, बजरंग पवार, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, लहूराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, संचालिका सौ.शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील व अधिकारी उपस्थित होते.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक