राज्यात आज 121 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर एक ही मृत्यूची नोंद नाही......
जिल्ह्यात एका बाधिताची वाढ...
कराड दि.22 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका बाधिताची वाढ झाली असून आज दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात काल 184 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 1 रुग्ण आहे.
सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-1 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17541), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 229 बाधितांची संख्या झाली आहे.
एकूण चाचण्या-25 लाख 76 हजार 690
एकूण बाधित-2 लाख 79 हजार 229
एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852
एकूण मृत्यू-6 हजार 683
सध्या उपचारार्थ रुग्ण-1
राज्यात शुक्रवारी 121 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यूची नोंद...
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात 121 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 817 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात शून्य कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 66 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात सध्या 817 अॅक्टिव्ह रुग्ण....
राज्यात सध्या 817 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 474 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 181, ठाण्यात 71 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद...
देशात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होती.आज या रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.दरम्यान, देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तस सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 आहे. गेल्या 24 तासांत 1,093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.

Comments
Post a Comment