देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू...

 


जिल्ह्यात एका ही बाधिताची वाढ नाही...

कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका ही बाधिताची वाढ झाली नाही तर आज एक ही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.जिल्ह्यात काल 171 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे.

सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60266), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 0 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 230 बाधितांची संख्या झाली आहे.

एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 61

एकूण बाधित-2 लाख 79 हजार 230 

एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 852

एकूण मृत्यू-6 हजार 683

सध्या उपचारार्थ रुग्ण-2

देशातील कोरोनाचा आलेख वाढतोय, गेल्या 24 तासांत 2 हजार 593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू...

देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 873

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 873 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 1755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 22 हजार 193 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत 187 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या

देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शनिवारी दिवसभरात देशात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या बुधुवारी (27 एप्रिल) पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशात 2 हजार 527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक