कराडातील तरूणाने घेतला संन्यास; दिक्षापूर्व मिरवणूकीत समाज बांधवांचा मोठा सहभाग...
कराडातील तरूणाने घेतला संन्यास; दिक्षापूर्व मिरवणूकीत समाज बांधवांचा मोठा सहभाग...
कराड दि.24 (प्रतिनिधी) शहरातील व्यावसायिक अनिल घेवरचंद मुथा यांचा तरुण मुलगा रजकुमार (वय 23) हा दीक्षा घेणार असल्याने त्याची आज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी झाले होते. सुपर मार्केट येथील जैन मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.मिरवणूकीत रजतकूमार आपल्या माता-पित्यासह सहभागी झाला होता. रजकुमार हा पुढील महिन्यात गुजरात मधील शंकेश्वर येथे दीक्षा घेणार आहे.
जैन धर्मियांमध्ये लहानापासून वृध्दापर्यंत अनेक जण संन्यास घेतात.मोह माया याचा त्याग करून संन्यासी जीवन जगण्यासाठी स्वताला अनेक जण समर्पित करतात. दिक्षा घेतल्या नंतर साधू बनून धर्म व साधना यामध्ये जीवन जगावं लागतं.चार महिन्यापूर्वी कराडातील यूवा पती-पत्नी यांनी ही संन्यास घेतला आहे.त्यानंतर आता रजतकूमार हा संन्यास घेणार असल्याने त्यापूर्वी आज शहरातुन मिरवणूक काढण्यात आली.बॅंन्ड बाजा,भवानी तांडव झांज पथक, भटिंडा येथिल गूरूगोविंद बॅन्ड, केरळ वाद्य पथकाच्या वाद्यात शहरातील जैन समाज या मिरवणूकीत सहभागी झाला होता.
Comments
Post a Comment