कराडमध्ये महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी ‘वॉकेथॉन’; ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’तर्फे आयोजन...


 कराडमध्ये महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी ‘वॉकेथॉन’....

‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’तर्फे आयोजन; डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती....
कराड, 29 : नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १) महाराष्ट्र दिनानिमित्त प्रीतिसंगम घाटावर सकाळी ६ वाजता ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, तसेच उत्तम आरोग्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी या ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. 'प्रत्येक नागरिक एक जीवन रक्षक' या उपक्रमाअंतर्गत अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाचे Compression only life support (COLS) म्हणजेच जीवनसंजीवनी क्रिया याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यावेळी दिले जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मोहिते व सचिव डॉ. श्रद्धा नाईक-बहुलेकर यांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक