जयवंत शुगर्सच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता...
जयवंत शुगर्सच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता...
१९० दिवसांत ७,६६,००० मेट्रीक टन ऊसगाळप; ८,२८,००० क्विंटल साखरेचे उत्पादन...
कराड, दि. 3 : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या ११ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले आणि श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.
धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १९० दिवसांच्या गळीत हंगामात ७ लाख ६६ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ८ लाख २८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४० टक्के इतका राहिलेला आहे. याचबरोबर जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्प ४५,००० लिटर प्रतिदिन क्षमतेने सुरू असून, या प्रकल्पात बी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती सुरु आहे. तसेच कारखान्याने १५ एप्रिलअखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २६०० रुपयांप्रमाणे उसबिलाची रक्कम वर्ग केली आहे.
हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा काशीद, नवनाथ आर्सुळ, परमेश्वर शेळके, संतोष ढाकणे, भारत मोहिते, नारायण माने, बजरंग धोत्रे, कल्याण ढोले, मधुकर जगताप, शामराव गुजर या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी कारखान्यातील मिल फिटर संजय वडकर आणि सौ. मनिषा वडकर या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, चोरे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय साळुंखे, जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, पर्चेस मॅनेजर व्ही. व्ही. थोरात, इरिगेशन इंजिनिअर आर. एस. नलवडे, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मुख्य शेतकरी अधिकारी आर. जे पाटील, मनुष्यबळ विकास अधिकारी संजय भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी विभागप्रमुख व्ही. जी. म्हसवडे, सुरक्षा अधिकारी जालिंदर यादव, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Comments
Post a Comment