Posts

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

Image
वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 21 : वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोटे (ता. कराड) येथे गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सौ. सत्वशीला चव्हाण, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, सुनंदा पाटील, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अमित जाधव, संजय तडाखे, कराडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, सौ. मंगल चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण, झाकीर पठाण, गोटेच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, धोंडेवाडीचे सरपंच रमेश भोसले, जगन्नाथ भोसले यांच्यासह अन...

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

Image
  मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी कराड, दि. 21 - मलकापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्षपदाच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५२७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तेजस सोनवणे यांना एकूण १०,७४९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५४७२, तर शिवसेना शिंदे गटाचे अक्षय मोहिते यांना ७०४ मते मिळाली. नगराध्यक्षपदासह नगर परिषदेच्या विविध प्रभागांतील निकाल जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीत अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या, तर काही प्रभाग बिनविरोध ठरले. प्रभाग क्रमांक १ अ मध्ये भाजपाच्या अश्विनी शिंगाडे यांनी राष्ट्रवादीच्या कांचन लोहार यांचा २९८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १ ब मध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नितीन काशीद पाटील यांनी ३१९ मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २ अ मध्ये भाजपाच्या गीतांजली पाटील यांनी १२१ मतांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक २ ब मध्ये अपक्ष उमेदवार भीमाशंकर माउर यांनी १०६ मतांनी बाजी मा...

कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजार स्पर्धकांचा सहभाग

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने आयोजित कृष्णा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक. कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजार स्पर्धकांचा सहभाग कराड, दि. 20 : कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेत, निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश दिला.  कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व कृष्णा औद्योगिक महिला संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून सकाळी ६ वाजता कृष्णा रूग्णालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ५ किमी आणि १० किमी अशा दोन गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये २००० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.  ५ किमी अंतराच्या पुरूषांच्या १८ वर्षाखालील गटात गणराज, अलंकार पोळ, हर्षवर्धन पुजारी; तर महिला गटात श्रेया गोंदाल, जान्हवी पाटील व अनुश्री काळे यांनी, १९ ते ३५ वयोगटातील पुरूष गटात दिपक सवाखंडे...

न्यायालयीन डिजिटल परिवर्तनातील शिलेदार : मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी

Image
न्यायालयीन डिजिटल परिवर्तनातील शिलेदार - मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी कराड, दि. 20 - भारतीय न्यायव्यवस्थेतील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पावले ही काळाची गरज बनली आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, वेगवान व खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हाव्यात, या उद्देशाने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई- कमिटीमार्फत ICT (National Policy and Action Plan for Implementation of Information and Communication Technology in Indian Judiciary) राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार मा. जिल्हा व सत्र न्यायालय, कराड येथे विधिज्ञ व विधिज्ञांचे क्लार्क यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या e-Training कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल तांत्रिक ज्ञानासोबतच विषय मांडण्याची सहज, सोपी व प्रात्यक्षिकांवर आधारित शैली उप...

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची सोमवारी १०१ वी जयंती

Image
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची सोमवारी १०१ वी जयंती जंगल अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन  कराड, ता. २० : कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी १०१ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कराड तालुका साखर कामगार संघ आणि श्री गणेश शिवोत्सव मंडळाच्यावतीने प्रा. ज्ञानदेव काशीद (बीड) यांचे ‘कृष्णाकाठच्या मातीत हवा जयवंतराव भोसले-आप्पासाहेब यांचा जन्म नवा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.  तसेच सायंकाळी ५ वाजता कराडच्या कृष्णा विश्व विद्यापीठातील नेचर पार्कमध्ये ‘रानगुंफी’ हे छायाचित्रात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक आणि जंगल अभ्यासक किर...

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

Image
कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी कराड, दि. 19 - कराड शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या साडेचार लाखाच्या नऊ मोटरसायकली शहरातील लक्ष्मी नगर झोपडपट्टीतील दोघाकडून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त करून दोघांना ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत काही महीन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. सदरबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हयांचा छडा लावण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व त्यांचे पथक कसोशीने सदर गुन्हयांचा तपास करीत होते. सदर गुन्हयाचे तपासदरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयांमधील दोन विधीसंघर्षित बालक आरोपी सनी महादेव चव्हाण रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी कराड यांना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी ताब्यात घेवुन सदर आरोपीत यांचेकडे कौशल्यपुर्व तपास केला असता नमुद आरोपीत यांनी कराड शहर परिसरातुन मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपीत यांनी नमुद आर...

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

Image
  कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार आप्पासाहेबांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे भव्य आयोजन कराड, दि. 19 : कराडमध्ये रविवारी (ता. २१) ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार रंगणार आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्याकडे वाटचाल करण्याचा आणि समाजमनात सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुमारे २००० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.  कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे ‘कृष्णा मॅरेथॉन २०२५’ या आरोग्यदायी व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवारी (ता. २१) पहाटे ५.३० वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून उत्साहात सुरू होणार आहे. सातारा जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये १० किमी व ५ किमी असे दोन गट ठेवण्यात ...

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

Image
सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यावर ठाम  कराड , दि. 19 : शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा पक्ष काँग्रेसच असल्याने हाताचं चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार असून तो जपण्याची आज नितांत गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. सुपने-तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मिटिंग सुपने येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, बलराज पाटील, जगदीश पाटील, अशोक पाटील, सतीश पानुगडे, सुहास पाटील, प्रदीपराव थोरात, बजरंग पाटील, दादाराम जाधव, विद्याधर पाटील, विजय देवकर, सौ. अक्षदा पवार, सौ. पूजा पवार, हिंदुराव पाटील, निवृत्ती माळी, आदिसह सुपने तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  त्यामुळे आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरच लढवाव्यात, यावर कार्यकर्ते ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नि...

पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार

Image
पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार ‘पी.आर.एस.आय.’च्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना; नूतन कार्यकारिणी जाहीर कराड, दि. 18 : देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया’ (पी.आर.एस.आय.) या संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या चॅप्टरमध्ये कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात जनसंपर्क व माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा समावेश असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारण्यास मदत होणार आहे.  पी.आर.एस.आय. ही संस्था भारतात १९६६ पासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत लोकांची व्यावसायिक संघटना आहे. जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समाजात जागृती, जनसंपर्क मूल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, तसेच जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, संशोधनास प्रोत्साहन अशी विविध प्रकारचे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.  संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची नवीन कार्यकारणी...

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक

Image
मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक मोबदल्याची मागणी; अंतवडीतील शेतकऱ्यांचे 'बांधकामास' निवेदन; शासनास दिला इशारा कराड, दि. 17 - मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग कराड उत्तर यांच्याकडून सुरू आहे. अंतवडी ता. कराड गावच्या हद्‌दीतील बेकायदेशीर अतिक्रमण व विना परवानगी भूसंपादनाबाबत गावातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा कसलाही मोबदल न देता मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास रस्त्याचे काम बंद करण्याबाबत शेतकरी आंदोलनाचे हत्यार उपसणार असून यासह कायदेशीर मार्ग देखील अवलंबणार आहे त्यामुळे होणाऱ्या प्रकारास बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशारा अंतवडीतील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान मोबदला न देता रस्त्याचे काम चालू ठेवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. पंढरपूर-मल्हारपेठ या राज्य मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम करताना बाधित शेतकऱ्यांना कसलाही मोबदला शासनाकडून देण्यात आलेला...

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

Image
स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ कराडला 26 डिसेंबर पासून प्रदर्शन, तयारीस वेग कराड, दि. 17 - शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा दि. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार असून, या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाचे हे प्रदर्शन २० वे वर्ष असून कृषी व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन व उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील–उंडाळकर यांच्या शुभहस्ते आज बुधवार, दि. १७ रोजी करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, सर्जेराव गुरव, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, जयंतीभाई पटेल, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासो पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संचालक सर्जेराव गुरव व कोयना बँकेचे संचालक संपतराव बडेकर यांच्य...

जीव वाचवताना गमावलेला जवान; लोकन्यायालयातून कुटुंबाला दिलासा

Image
  जीव वाचवताना गमावलेला जवान; लोकन्यायालयातून कुटुंबाला दिलासा कराड लोकन्यायालयात 1 कोटींची ऐतिहासिक तडजोड कराड, दि. 14 - देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारा जवान, सुट्टीवर गावात आला असताना शेजारील युवकाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतो… आणि त्या धावण्यातच स्वतःचा प्राण गमावतो. सीमा सुरक्षा दलातील जवान नितीन मोहन शेवाळे (वय 33, रा. शेवाळेवाडी, उंडाळे, ता. कराड) यांच्या बलिदानाची ही हृदयद्रावक कहाणी कराड लोकन्यायालयात अश्रूंना वाट करून देणारी ठरली. सुट्टीवर आलेले जवान नितीन शेवाळे यांना बिबट्याच्या भीतीने झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या युवकाची माहिती मिळाली. कोणताही विचार न करता, मानवतेच्या भावनेतून त्यांनी जखमी युवकाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. स्वतः दुचाकीवरून, तर जखमी युवक चारचाकीतून रुग्णालयाकडे जात असताना पुणे–बेंगलोर महामार्गावर जखिणवाडी–नांदलापूर परिसरात टोयोटो करोला अल्टिस गाडीच्या धडकेत जवान नितीन शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात केवळ एका कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण समाजावर शोककळा पसरवणारा ठरला. पाठीमागे पत...

'कृष्णा'त रंगला भक्तिमय संगीत सोहळा....

Image
'कृष्णा'त रंगला भक्तिमय संगीत सोहळा स्व. जयमाला भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; रसिक श्रोते मंत्रमुग्ध कराड, ता. १४ : कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्वर्गीय जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय संगीत सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सौ. सुवर्णादेवी देशमुख, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सौ. रंजना मोहिते, सौ. उत्तरा भोसले, पृथ्वीराज भोसले, सौ. वसुंधरा भोसले, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, तिलोत्तमा मोहिते, सुदन मोहिते, हर्षदा मोहिते, डॉ. प्रियदर्शनी पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदाताई जाधव, सौ. रोहिणी शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  या मान्यवरांनी आईसाहेबांच्य...

कराड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी : प्रमोद पाटील

Image
  कराड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी : प्रमोद पाटील कराड, दि. 12 - कराड शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजनासह बुजवण्यात यावेत अशी मागणी 'दक्ष कराडकर'च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी कराड नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, पावसाळा संपून दोन महिने उलटूनही शहरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून अजूनही दुरुस्ती झाली नाही. विशेषत: दैत्य निवारणी मंदिर तसेच जुन्या कोयना पुलाकडे जाणारा रस्ता, अशोक चौक ते पोस्ट ऑफिस मार्ग, दर्गा मोहल्ला मेन रोड ते कन्या शाळा पुढे कृष्णा नाका सर्कल तसेच कार्वे नाका कडे जाणारा मुख्य मार्ग, तसेच शहरातील बऱ्याच रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.. शहरातील हे रस्ते अत्यंत खराब स्थितीत आहेत. यापैकी दैत्य निवारणी मंदिर कडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे असून वाहनचालक व पादचारी यांच्या जीवाला स्पष्टपणे धोका निर्माण करीत आहेत. दररोज अपघातासारख्या पर...

कराडात स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजन

Image
  कराड - पत्रकार परिषदेत बोलताना सुनिता जाधव समवेत अमर जाधव, एड. संभाजीराव मोहिते, तनय जाधव कराडात स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजन  कराड, दि. 12 : - कराडचे सुपुत्र, स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव  जाधव (दादा) यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व कराडच्या विकासात दिलेले योगदान व कार्य भावी पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या स्नुषा सुनिता दिलीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, ॲड. संभाजीराव मोहिते,अर्बन बँकेचे चेअरमन समीर जोशी, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, स्वातंत्र्य सेनानी जाधव यांचे नातू अमर जाधव, तनय जाधव उपस्थित होते.  जाधव म्हणाल्या, वीर माधवराव यांचे स्वातंत्र लढ्‌यातील कार्य अव्दितीय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी केलेला भीम पराक्रम आणि स्वातंत्र्योत्तर काळात कराडसह राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कराड शहर व परिसरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये जाधव यांचे योगदान मोठे असून, शिवाजी ...

कराड येथे 14 ते 16 विजय दिवस समारोहाचे आयोजन

Image
  कराड येथे 14 ते 16 विजय दिवस समारोहाचे आयोजन ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार कराड, दि. 11 - भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या प्रित्यर्थ, कराड येथे सन १९९८ पासून विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी दि. 14 डिसेंबर ने 16 डिसेंबर २०२५ दरम्यान या समारोहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव ॲड. संभाजीराव मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चंद्रकांत जाधव, विलास जाधव उपस्थित होते. या विजय दिवस समारोहात दि १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, हे रक्तदान शिबीर छत्रपती शिवाजी महाराज आखाडा कराड येथे आयोजन केले आहे. दि १४ रोजी दुपारी ३ वाजता, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.  दि १५ रोजी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने महासैनिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सौ वेणूताई चव्हाण सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या वर्षी समारोहाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार...

क्रांतीअग्रनी स्व.डॉ.जी.डी.बापू लाड आदर्श व्यक्तीमहत्व- मा. आ.आनंदराव पाटील

Image
क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांना अभिवादन करताना मा. आमदार आनंदराव पाटील, आ. अरुण आण्णा लाड, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते. क्रांतीअग्रणी स्व. जी. डी. बापू लाड आदर्श व्यक्तिमत्व - मा. आ. आनंदराव पाटील जी डी बापू सारखी माणसे जन्माला यावी; भास्करराव पेरे पाटील कराड, दि. 11 - क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासारखी माणसे पुन्हा जन्माला यावी, त्यांचे विचार समाजात रुजवण्याची गरज असून त्यांच्या विचारानुसार पूर्ण क्रांती झाली पाहिजे असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कुंडल येथे आयोजित क्रांतीअग्रणी व्याख्यानमाला 2025 या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफताना आमचा गाव आमचा विकास या विषयावर पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मा. आमदार आनंदराव पाटील (नाना) होते. पेरे पाटील पुढे म्हणाले, गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास कसा केला जाऊ शकतो. गावामध्ये विविध प्रकारच्या योजना ...

कराडच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी एआय टेक्नॉलॉजी...

Image
कराडच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी एआय टेक्नॉलॉजी कराड, दि. 10 - शेतकऱ्यांसाठी ‘एआय टेक्नॉलॉजी’ बाबत अत्याधुनिक माहिती आणि मार्गदर्शन हे यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असून प्रदर्शनात शेतकऱ्यांसह बचत गटांसाठी 100 मोफत स्टॉल उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, गणपत पाटील, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव गुरव यांच्यासह सचिव आबासाहेब पाटील व अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट नजीक असणाऱ्या जनावरांच्या बाजार तळावर प्रति वर्षाप्रमाणे यंदाही 26 डिसेंबर पासून कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरवले जाणार असल्याचे सांगून इंगवले म्हणाले, कृषी प्रदर्शनाचे यंदा 20 वे वर्ष असून शासन कृषी विभागाच्या सर्वोतपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभणार आहे. जनावरांच्या बाजार त...

कराड अर्बन बँकेच्या संचालकपदी उल्हास शेठ यांची निवड

Image
कराड अर्बन बँकेच्या संचालकपदी उल्हास शेठ यांची निवड कराड, दि. 9 - कराड अर्बन बँकेच्या नैमित्रिक कारणाने रिक्त झालेल्या संचालकपदी कराड येथील सुप्रसिद्ध अडत व्यापारी उल्हास तुलशीराम शेठ यांची निवड करण्यात आली. याकामी अध्यासी अधिकारी म्हणून अपर्णा यादव उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांनी कामकाज पाहिले.  याप्रसंगी नूतन संचालक उल्हास शेठ यांचा सत्कार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे व बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे सन्माननीय सर्व संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इंडिगो पेचप्रसंगावर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Image
  इंडिगो पेचप्रसंगावर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी मुंबई, दि. 8 : इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील पेच प्रसंग व संकट आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका चव्हाण यांनी ठेवला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिगो चा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. हे सर्व DGCA आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट आणि ढिलाईमुळे घडले. त्यांनी सांगितले की DGCA ने 1 जुलै 2024 पासून लागू करायचे नियमांची अंमलबजावणी न झाल्याने मक्तेदारी वाढत गेली. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी राहिली आहे. इंडिगो 65% आणि टाटा समूह 30%. ह...