कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजार स्पर्धकांचा सहभाग

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने आयोजित कृष्णा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक.

कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजार स्पर्धकांचा सहभाग

कराड, दि. 20 : कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेत, निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश दिला. 

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व कृष्णा औद्योगिक महिला संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून सकाळी ६ वाजता कृष्णा रूग्णालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ५ किमी आणि १० किमी अशा दोन गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये २००० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 

५ किमी अंतराच्या पुरूषांच्या १८ वर्षाखालील गटात गणराज, अलंकार पोळ, हर्षवर्धन पुजारी; तर महिला गटात श्रेया गोंदाल, जान्हवी पाटील व अनुश्री काळे यांनी, १९ ते ३५ वयोगटातील पुरूष गटात दिपक सवाखंडे, पवन कुंभार, अवधुत शिवणीकर; तर महिला गटात सकिना इद्रासी, कल्याणी थोरात व शिवानी भणगे यांनी, ३६ ते ४५ वयोगटातील पुरूष गटात अमोल थोरात, निवास हांगे, संजय साळुंखे; तर महिला गटात विशाखा पाटील, मेघा साळुंखे व रुपाली जाधव यांनी, ४६ ते ५५ वयोगटातील पुरूष गटात मारुती चाळके, दत्तात्रय देसाई, अंकुश माळी; तर महिला गटात सुनिता सूर्यवंशी, वैशाली चव्हाण व माधवी शिंदे यांनी, ५५ वर्षांवरील पुरूष गटात मुरलीकृष्ण वत्स, रामचंद्र शेळके, चंद्रकांत पाटील; तर महिला गटात अमिता गोखले, माधुरी पांचारिया, मीरा भापकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.

१० किमी अंतराच्या पुरूषांच्या १८ वर्षाखालील गटात शुभम पाटील, प्रथमेश भोसले, ओंकार; तर महिला गटात रितीका मोहिते, आर्या देशमुख, अवनी चव्हाण यांनी, १९ ते ३५ वयोगटातील पुरूष गटात रतन धामी, वेदांत सुतार, वैभव बेंद्रे; तर महिला गटात जान्हवी पाटील, सानिका साबीर, अनुषा रावत यांनी, ३६ ते ४५ वयोगटातील पुरूष गटात केसर ठाकूर, विशाल केसरकर, मिथुन गावित; तर महिला गटात शैलजा पाटणकर, अनुराधा बोकील, अमृता जाधव यांनी, ४६ ते ५५ वयोगटातील पुरूष गटात वसंत लकडे, अंकुश गायकवाड, यशवंत घाडगे; तर महिला गटात वसुधा वत्स, निर्मला माने यांनी, ५५ वर्षांवरील पुरूष गटात लक्ष्मण यादव, सुधीर शाह, सतीश शिंदे; तर महिला गटात निलीमा वनारसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.

विजेत्यांना डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते मेडल व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी कृष्णा मॅरेथॉनचे मोठ्या प्रमाणात आयोजन करुन, पुढील वर्षीपासून २१ किमी रनिंग ट्रॅकचाही समावेश करणार असल्याचे सांगून डॉ. भोसले यांनी या मॅरेथॉनला ऐतिहासिक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

अजीम कागदी यांनी सूत्रसंचालन केले. मधुरा राऊत व अभिजीत पाटील यांनी झुम्बा नृत्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. विनोद बाबर यांच्यासह विविध संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडच्या क्रीडापट्टूंचा विशेष सन्मान

कृष्णा मॅरेथॉनच्या उद्‌घाटनप्रसंगी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कराडच्या क्रीडापट्टूंचा डॉ. सुरेश भोसले यांच्या विशेष सन्मान करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथानमध्ये सहभागी झालेले डॉ. सी. व्ही. महाजन, डॉ. शैलेश पाटील व संदीप पाटील, तसेच डबल सुपर रँड्युनर फिनिशर चंद्रजीत पाटील व रवी जाधव आणि आयर्नमॅन ऑस्ट्रेलिया फिनिशर उमेश पांचारिया यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक