क्रांतीअग्रनी स्व.डॉ.जी.डी.बापू लाड आदर्श व्यक्तीमहत्व- मा. आ.आनंदराव पाटील
क्रांतीअग्रणी स्व. जी. डी. बापू लाड आदर्श व्यक्तिमत्व - मा. आ. आनंदराव पाटील
जी डी बापू सारखी माणसे जन्माला यावी; भास्करराव पेरे पाटील
कराड, दि. 11 - क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासारखी माणसे पुन्हा जन्माला यावी, त्यांचे विचार समाजात रुजवण्याची गरज असून त्यांच्या विचारानुसार पूर्ण क्रांती झाली पाहिजे असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कुंडल येथे आयोजित क्रांतीअग्रणी व्याख्यानमाला 2025 या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफताना आमचा गाव आमचा विकास या विषयावर पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मा. आमदार आनंदराव पाटील (नाना) होते.
पेरे पाटील पुढे म्हणाले, गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास कसा केला जाऊ शकतो. गावामध्ये विविध प्रकारच्या योजना कश्या राबविल्या पाहिजेत स्वच्छ गावं सुंदर गावं बनविण्यासाठी विविध उपक्रम कसे राबाविले जाऊ शकतात याची अनेक उदाहरणे देत शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचाती मधून अनेक विकास कामे गावामध्ये करता येतात यावरती त्यांनी मार्गदर्शन केले
माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांनी क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापूंच्या जीवन कार्याचा आढावा घेत म्हणाले, बापूनी कुंडल तसेंच पलूस तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामे करण्यात पुढाकार घेतला. अनेक सहकारी संस्था उभा करून गोर गरिबांना विशेष करून तरुणांना रोजगार निर्माण करून दिला. अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम केली. त्यांनी क्रांती कारखान्याची उभारणी केली. त्याचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बापूंनी दूर दृष्टी ठेऊन उभे केलेले हे सहकारचे जाळे व त्यांच्या विचारांचा वारसा आदरणीय आमदार अरुण अण्णा लाड, किरण तात्या, उदय दादा लाड, शरद लाड हे जपत आहेत
यावेळी कार्यक्रमाला आमदार अरुण आण्णा लाड, एमपीएससी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, ज्येष्ठ उद्योजक उदय लाड,जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड,क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड,धनश्री ताई लाड उपस्थित होते


Comments
Post a Comment