न्यायालयीन डिजिटल परिवर्तनातील शिलेदार : मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी


न्यायालयीन डिजिटल परिवर्तनातील शिलेदार - मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी

कराड, दि. 20 - भारतीय न्यायव्यवस्थेतील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पावले ही काळाची गरज बनली आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, वेगवान व खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हाव्यात, या उद्देशाने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई- कमिटीमार्फत ICT (National Policy and Action Plan for Implementation of Information and Communication Technology in Indian Judiciary) राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मास्टर ट्रेनर ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार मा. जिल्हा व सत्र न्यायालय, कराड येथे विधिज्ञ व विधिज्ञांचे क्लार्क यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या e-Training कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल तांत्रिक ज्ञानासोबतच विषय मांडण्याची सहज, सोपी व प्रात्यक्षिकांवर आधारित शैली उपस्थित विधिज्ञांना विशेष लाभदायक ठरली.

ॲड. विशाल कुलकर्णी यांनी e-Courts Services App व अधिकृत वेबसाईट यांच्या माध्यमातून अकाउंट तयार करण्यापासून ते कोर्ट केसेसचे e-filing, कागदपत्रे अपलोड करणे, केसेसची सद्यस्थिती तपासणे, आदेश व तारखांची माहिती मिळवणे अशा सर्व बाबींचे टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाबाबत मर्यादित अनुभव असलेल्या विधिज्ञांनाही सहज समजेल अशा भाषेत त्यांनी संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली, हे त्यांच्या प्रशिक्षणाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

न्यायालयीन कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढवून वकील, पक्षकार व न्यायालयीन यंत्रणा यांचा वेळ आणि खर्च वाचवणे, तसेच न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक बनवणे, या उद्दिष्टांसाठी ॲड. विशाल कुलकर्णी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांची कार्यपद्धती ही केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित न राहता विधिज्ञांना डिजिटल युगाशी आत्मविश्वासाने जोडणारी आहे.

कराड बार असोसिएशनच्या सन्माननीय वकील सदस्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ॲड. विशाल एस. कुलकर्णी यांच्या प्रशिक्षण क्षमतेचा व कार्यक्षमतेचा प्रत्यय देणारा आहे. न्यायालयीन डिजिटल युगात विधिज्ञांना मार्गदर्शन करणारे असे प्रशिक्षक ही आजच्या काळाची गरज असून, त्या भूमिकेत ॲड. विशाल कुलकर्णी निश्चितच आदर्श ठरत आहेत.

न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणात योगदान देणाऱ्या विशाल कुलकर्णी यांना आता राज्यभरात इतरत्रही विशेष प्रशिक्षणासाठी बोलावले जात आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक