कराड येथे 14 ते 16 विजय दिवस समारोहाचे आयोजन
कराड येथे 14 ते 16 विजय दिवस समारोहाचे आयोजन
ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार
कराड, दि. 11 - भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या प्रित्यर्थ, कराड येथे सन १९९८ पासून विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी दि. 14 डिसेंबर ने 16 डिसेंबर २०२५ दरम्यान या समारोहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव ॲड. संभाजीराव मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चंद्रकांत जाधव, विलास जाधव उपस्थित होते.
या विजय दिवस समारोहात दि १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, हे रक्तदान शिबीर छत्रपती शिवाजी महाराज आखाडा कराड येथे आयोजन केले आहे. दि १४ रोजी दुपारी ३ वाजता, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
दि १५ रोजी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने महासैनिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सौ वेणूताई चव्हाण सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या वर्षी समारोहाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार, ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार कराड यांना देण्यात येणार असून, सत्यभामा ज्ञानदेव कणसे यांचे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार पशुपक्षी संगोपक साहाराबी सय्यद कराड यांना दिला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळा आणि महामैनिक संमेलनासाठी भारतीय सैन्यदलाचे ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी हे उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ महादेव सगरे, सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे हे उपस्थित राहणार आहेत.
दि १६ डिसेंबर रोजी तळबीड येथे भारतीय सैन्यदलाच्या वतीने, सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे समाधीस मानवंदना देण्यात येणार आहे. वरील सर्व कार्यक्रमाना नागरिकांनी व युवा-युवती यांनी बहुसंख्येणे उपस्थित राहावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समिती कराडचे वतीने कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले आहे.

Comments
Post a Comment