Posts

Showing posts from February, 2025

कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

Image
कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन. कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचा सिद्धांत रुजवणारे सेवावृत्ती पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू पाटसकर यांच्या माध्यमातून विकासपर्व जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ शनिवार दि. 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनुसार समाजात विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू प...

अपघातग्रस्त ‘नीलम’च्या भेटीसाठी व्याकूळलेल्या वडिलांच्या व्हिसासाठी सरसावले आ.डॉ. अतुलबाबा भोसले

Image
  अपघातग्रस्त ‘नीलम’च्या भेटीसाठी व्याकूळलेल्या वडिलांच्या व्हिसासाठी सरसावले आ.डॉ. अतुलबाबा भोसले मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे व्हिसा मिळण्याचा मार्ग सुकर; अमेरिकन दुतावासाकडून शुक्रवारची अपाईंटमेंट कराड, दि. 27 - अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या उंब्रज (वडगाव) येथील नीलम शिंदे या युवतीचा १२ दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात आय.सी.यु.मध्ये उपचार सुरू असून, तिला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या तिच्या वडिलांना मात्र गेल्या १० दिवसांपासून व्हिसा मिळविण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता.  याबाबतची माहिती मिळताच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेमुळे या अपघातग्रस्त मुलीच्या वडिलांना व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अमेरिकन दुतावासाने मुंबईत शुक्रवारी (ता. २८) व्हिसासाठी त्यांची अपाईंटमेंट निश्चित केली आहे.  उंब्रज (वडगाव) येथील ३५ वर्षीय नीलम शिंदे गेल्या ४ वर्षांपासून अमेरिकेत एम.एस.च्या शिक्षणासाठी...

सातारा जिल्हा पोलीस दलाने पटकावला छत्रपती शिवाजी महाराज चषक

Image
कराड - मान्यवरांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज चषक विजेता सातारा पोलीस दलाचा संघ... सातारा जिल्हा पोलीस दलाच्या क्रिकेट संघाने पटकावला छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 कराड नगरपरिषद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न... कराड, दि. 25 (प्रतिनिधी) - कराड नगरपरिषद आयोजित सातारा जिल्हयातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज चषक सातारा जिल्हा पोलीस दलाच्या संघाने पटकावला. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली चार दिवस या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता. कराड - द्वितीय क्रमांकाचे बक्षीस व चषक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना  प्रायमरी टीचर्स कराडचा संघ... कराड नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज चषक २०२५ बघ टेनिस स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे केलेले होते. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व्ही एन गांधी ज्वलर्सचे मालक सुरज गांधी यांच्या ...

स्व. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन; बाळासाहेब पाटील

Image
  विद्यानगर : सायन्स कॉलेज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मा. आ. बाळासाहेब पाटील, समवेत मान्यवर स्व. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन; बाळासाहेब पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती कराड, दि. 21 (प्रतिनिधी) - येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळा (दि.२ फेब्रुवारी, २०२५ ते १ फेब्रुवारी, २०२६) विविध कार्यक्रमाने आयोजित केल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष व सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, अरुण पाटील (काका) सुनील पवार,नंदकुमार बटाणे, डॉ. सूर्यकांत केंगार,अशोक पोतदार उपस्थित होते. जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १० मार्च, २०२५ रोजी कर्तृत्ववान म...

कराडच्या रिमांड होमला राष्ट्रीय नामांकनासह उत्कृष्ट बाल निरक्षण गृह पुरस्कार जाहीर

Image
कराडच्या रिमांड होमला राष्ट्रीय नामांकनासह उत्कृष्ट बाल निरक्षण गृह पुरस्कार जाहीर कराड, दि. 20 (प्रतिनिधी) - येथील कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह/ निरीक्षणग्रह (रिमांड होम) कराड या संस्थेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय नामांकनासह महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा उत्कृष्ट बाल निरीक्षण गृह पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पवार, सदस्य सत्यनारायण मिनियार, मोहन पाटील, तानाजी पाटील, प्रकाश पालकर, विनोद सावंत, विजय भोसले, संस्थेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र शासन महिला व बालविकास आयुक्तालय पुणे व आंतरराष्ट्रीय मिरकॅल फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने कौटुंबिक बळकटीकरण व कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रणाली बळकटीकरण आणि अंमलबजावणीसाठी कराडच्या या संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन गत आठवड्यात दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शिखर परिषदेत या संस्थेला राष्ट्रीय नामांकन दिले असल्याचे सांगून म्हेत्रे यांनी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या वतीने राज्य...

कराड नगरपरिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 प्रारंभ

Image
छत्रपती शिवाजी महाराज चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ करताना मुख्याधिकारी शंकर कंधारे व इतर मान्यवर.  कराड नगरपरिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 स्पर्धेस प्रारंभ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून विविध संघ दाखल कराड, दि. 20 (प्रतिनिधी) - कराड नगरपरिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात प्रारंभ झाला. मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून आठ संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास 25 हजार रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे. आजपासून चार दिवस चालणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 स्पर्धेची तयारी कराड नगर परिषदेने केले आहे. आज पहिल्या दिवशी कराड नगरपरिषद, महावितरण कराड कर्मचारी, कृषी विभाग सातारा, पाटण टीचर्स, सार्वजनिक बांधकाम विभाग कराड, पाटबंधारे विभाग कराड, जिल्हा रुग्णालय सातारा, महावितरण वडूज या संघाने सहभाग घेतला होता. आज सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर कराड नगरपर...

माजी.आ. आनंदरावजी पाटील (नाना) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

Image
माजी.आ. आनंदरावजी पाटील (नाना) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. कराड, दि. 19 (प्रतिनिधी) - कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व महाराष्ट्र विधानपरिषदचे माजी आमदार. आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त राजकीय, सामाजिक शैक्षणिक, कृषी, औ‌द्यागिक प्रशासकीय सेवेतील मान्यवरांनी हितचिंतक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन वरून व सोशिअल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सकाळी कौटुंबिक औक्षण केल्या नंतर विजयनगर येथील ग्रामदैवत महाकाली देवीचे दर्शन घेऊन गावातील सर्व कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर कराड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. मंगळवार पेठ येथील श्री. जोतीबा देवाचे दर्शन घेतले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांना अभिवादन करून कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथील निवास्थानी उपस्थित राहिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. प्रामु...

त्याग अन् निष्ठेचे प्रतीक - आनंदराव पाटील (नाना)...

Image
  त्याग अन् निष्ठेचे प्रतीक - आनंदराव पाटील (नाना)... त्याग, निष्ठा, सेवा, नाती सांभाळत समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून जनमानसात स्वतःची स्वच्छ प्रतिमा निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व, उत्कृष्ट समन्वयक, कर्तव्यनिष्ठ नेता, सर्वसामान्य नेतृत्व, सेवेचे विद्यापीठ, रचनात्मक कार्य, पीडितांचा मित्र म्हणून व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भक्कम आधारस्तंभ माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा आज बुधवार 19 रोजी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. आनंदराव पाटील (नाना) सामान्य कार्यकर्त्यांना नाना कधी विसरले नाहीत. सामान्य कार्यकर्ता हीच त्यांची खरी शक्ती आहे, याचे भान त्यांनी नेहमीच ठेवले आहे. असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे नाना हजारो युवकांच्या मनामनात आहेत. गोरगरीब कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता, कसल्याही संकटात धावून कार्यकर्त्यांना जपणारा तळमळीचा नेता अशी नानांची जनसामान्यात प्रतिमा निर्माण झालेली आहे. नानांना सुरुवातीपासून सर्व राजकीय व शासकीय पदे मिळत गेली. त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग नानांनी सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी ...

ड्रग्ज तस्करी प्रकरणातील १२ जणांच्या पोलीस कोठडीत वाढ...

Image
  ड्रग्ज तस्करी प्रकरणातील १२ जणांच्या पोलीस कोठडीत वाढ... कराड दि. 17 - एम.डी. ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या १२ जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज सोमवारी आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. ड्रग्ज प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून यामधील संशयितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  अमित घरत (रा. करांजडे, ता. पनवेल), दीपक सुर्यवंशी (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), बेंजामिन कोरु (रा. कोपरखैरणे नवी मुंबई), रोहित शहा (रा. शनिवार पेठ, कराड), सागना इ मॅन्युअल (रा. घणसोली, नवी मुंबई), नयन मागाडे (रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद देवरुखकर (रा. पावस्कर गल्ली, कराड), संतोष दोडमणी (रा. सैदापूर), फैज मोमीन (रा. मार्केट यार्ड, कराड), राहुल बडे (रा. सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम शेख (रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड), तौसीब बारगिर (रा. कार्वेनाका, कराड) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत.  पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने ओगलेवाडी (ता. कराड) येथे छापा टाकून ड्रग्ज विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन ज...

माजी आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार...

Image
  माजी आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार कराड, दि. 17 - माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त माजी आमदार आनंदराव पाटील नाना दिवसभर कराड बनपुरी कॉलनीतील निवासस्थानी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी सकाळी विजयनगर येथे ग्रामदैवत महाकालीचे दर्शन घेऊन दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत, त्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुढे मंगळवार पेठ येथील श्री. जोतीबा देवाचे दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथील निवास्थानी उपस्थित राहणार आहेत. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी येताना हार तुरे पुष्पगुच्छ आणू नयेत, त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य, वह्या, पुस्तके आदी साहित्य आ...

"स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार" डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर

Image
"स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार" डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर  १८ रोजी उंडाळे येथे स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण कराड, दि. 14 (वार्ताहर) - उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृतीदिनानिमित्त ४२ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व स्यत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रा. धनाजी काटकर, गणपतराव कणसे उपस्थित होते ऍड. पाटील म्हणाले, अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वतवाणी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी प्रमूख पाहुणे म्हणून माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत (निवृत्त) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. रोख रक्कम, स...

पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कराड नगर परिषदेच्या कलाकारांचे घवघवीत यश

Image
पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची उत्तुंग कामगिरी; विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग नगरपरिषद प्रशासन संचलनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पुणे विभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सातारा जिल्ह्याने सर्वात जास्त पारितोषिके मिळविली असून त्यामध्ये कराड नगर परिषदेच्या कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. कराड नगर परिषद परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विभागाने घेतलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात ही मोठी कामगिरी करत अनेक पारितोषिके प्राप्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पुन्हा कराड नगरपरिषदेच्या कर्मचारी कलाकारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगर अभियंता आर डी गायकवाड, आरोग्य अभियंता गिरीश काकडे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी य...

कराडच्या लिगाडे - पाटील कॉलेजचा साहिल लाडे जिल्ह्यात प्रथम

Image
कराड : यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे यांच्यासह प्राध्यापक. कराडच्या लिगाडे - पाटील कॉलेजचा साहिल लाडे जिल्ह्यात प्रथम   जेईई मेन्स परिक्षेत गौरवास्पद कामगिरी; अन्य विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कराड, दि. 14 - कराडमधील अग्रगण्य कॉलेज अशी ओळख असणाऱ्या लिगाडे पाटील कॉलेजच्या जेईई मेन्स २०२५ परिक्षेत साहिल लाडे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याने ९९.९२८ टक्के गुण मिळविले असून मानसी फाळके हिने सुद्धा ९९.२३४ टक्के गुण मिळवित गौरवास्पद कामगिरी केली आहे. देशभरात १२ लाख ५८ हजार १९६ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती आणि यात लिगाडे पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कराडकरांसाठी अभिमानास्पद आहे. प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या साहिल लाडे व मानसी फाळके यांच्यासह श्रेयस कदम (९८.६७६) नवनाथ बजबले (९८.०६३), गौरी गोडसे (९६.९२३ अथर्व जाधव (९६.५०२), अनुराग पाधीन (९५.२३५) यांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कॉलेजमध्ये घेण्यात आला. प्र...

कराड नजीक एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न...

Image
  कराड नजीक एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न कराड, दि.10 (वार्ताहर) - विमानतळ-मुंढे, ता. कराड येथे चोरट्याने एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत इंडिया वन पेमेंट सर्विस लिमिटेडचे कस्टोडियन शशिकांत पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पाटण रोडवरील विमानतळ-मुंढे येथे इंडिया वन पेमेंट सर्व्हीसचे एटीएम आहे. या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम कस्टोडियन शशिकांत पाटील हे करत असतात. पाटील यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता विमानतळ-मुंढे येथील मशीनमध्ये पैसे लोड केले व ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पाटील इस्लामपूर येथे बँकेच्या कामासाठी गेलेले असताना पोलिसांनी त्यांना फोन करून विमानतळ-मुंढे येथील एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता एटीएम मशीनचा समोरचा दरवाजा व सेफ्टी लॉकचा डायलर तोडल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी एकंदरीत पहाणी केली असता चोरीच्या उद्देशाने एटीएमचा दरवाजा आणि सेफ्टी लॉकचा डायलर फोडून मशीनचे नुकसान झाल्याचे ...

मंदिरातील चोरीचा सहा तासात गुन्हा उघड; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

Image
  मंदिरातील चोरीचा सहा तासात गुन्हा उघड; तीन अल्पवयीन मुले ताब्यात कराड, दि. १० (वार्ताहर) - येथील बैल बाजार मलकापूर रोडवर असणाऱ्या गणेश मंदिरातून दानपेटीतील रोख रक्कम व चांदीची गणेश मूर्ती चोरी प्रकरणी कराड शहर पोलिसांनी सहा तासात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या मुलांकडून 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री बैलबाजार रोड मलकापुर येथील गणेश मंदीरातुन रोख रक्क्रम व चांदीचे आवरण असलेली धातुची गणपतीची मुर्ती चोरी झाल्याची घटना घडली होती.  याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांची टीम या गुन्हयाचा तात्काळ तपास करीत होती. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयामधील 3 अल्पवयीन मुलांना (विधीसंघर्षित बालकांना) ताब्यात घेवुन अधिक  तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेला माल रो...

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नीलम मिश्रा यांना नियुक्ती आदेश प्रदान करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डावीकडून डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. श्रीनिवास बल्ली. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती; मंगळवारी स्वीकारणार कार्यभार कराड, दि. 10 : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी दिली. डॉ. मिश्रा यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा विद्यापीठाने कुलगुरु निवडीसाठी रितसर शोध समिती गठीत केली होती. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ॲन्ड बिलीरी सायन्सेसचे कुलगुरू डॉ. दीपक टेम्पे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य प्रा. ई. सुरेश कुमार आणि वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांचा समावेश होता.  या शोध समितीने ३ नावे निश्चित करुन, ती कृ...

सोशल मीडियातील पोस्टवरून कराडात तरुणास बेदम मारहाण

Image
  सोशल मीडियातील पोस्टवरून कराडात तरुणास बेदम मारहाण  कराड, दि. 7 (प्रतिनिधी) सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणातून कराडात एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संतप्त युवकांनी कोल्हापूर नाक्यावरील एका फेमस बारची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कराडला भेट दिली आहे.  दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या अबरार कोकणे (22) या तरुणास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एका तरुणाने यापूर्वी खून झालेल्या एकावर व त्याच्याशी संबंधित एकाच्या फोटोवर पोस्ट केली होती. सदरची पोस्ट वायरल झाल्यानंतर पोस्टवरून चिडलेल्या शहरातील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पोस्ट करणाऱ्या सूर्यवंशी मळा मुजावर कॉलनी दरम्यान राहणाऱ्या त्या तरुणास आज्ञात स्थळी नेत काठी, पाईप व अन्य घातक शस्त्रांचा वापर करून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संबंधित तरुण...

सह्याद्रिच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाचा 7 रोजी बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ

Image
सह्याद्रिच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाचा 7 रोजी बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ  कराड, दि. 5 - यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिन 7 हजार 500 मे. टनावरून 11 हजार मे. टन विस्तारवाढ प्रकल्पामधील 150 टन/ प्रतितास क्षमतेच्या नवीन बॉयलरचा अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.00 वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली. या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.  

कराड नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू

Image
कराड नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू; प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई कराड, दि. 4 - कराड नगरपालिकेने शहरामध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा सक्रिय केली असून 'मी प्लास्टिक वापरणार नाही, दुसऱ्याला वापरू देणार नाही' या ब्रिदवाक्याखाली शहरातील व्यापारी, दुकानदार यांच्याकडे बंदी असणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत बसस्थानक परिसरात रस्त्यावर फुले विक्रेत्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पाच हजाराचा दंड करून 15 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.  प्लास्टिक कारवाई संदर्भात नगरपालिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. शासनाने सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असतानाही अनेक व्यापारी, दुकानदार प्लास्टिकची विक्री व वापर करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा यांनी दर शुक्रवारी कारवाई करणेचे आदेश दिले आहेत. कराड नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने गेली अनेक वर्ष कराड शहरात प्लास्टिक विरोधी भूमिका घेत वेळोवेळी दंडात्मक कारवाया केल्याने शहरातील प्लास्टिक वापर व विक्...

कृष्णा हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर ‌गुंतागुंतीची ‘टावी‌’ शस्त्रक्रिया यशस्वी

Image
कराड : कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘टावी‌’ शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाची विचारपूस करताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके व अन्य.   कृष्णा हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर ‌गुंतागुंतीची ‘टावी‌’ शस्त्रक्रिया यशस्वी कराड, दि. 3 - येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर ‌‘टावी‌’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) अर्थात हृदयाला कृत्रिम झडप बसविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. पूर्ण भूल न देता, तसेच चिरफाड न करता करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया माजी सैनिकांसाठी असलेल्या ई.सी.एच.एस. योजनेअंतर्गत करण्यात आली असून, या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.  खटाव तालुक्यात राहणारे ८७ वर्षीय विश्वनाथ जाधव (नाव बदलले आहे) यांनी भारतीय सैन्यदलात दीर्घकाळ सेवा बजाविली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय तपासणीअंती त्यांच्या हृदयाची मुख्य झडप अरुंद झाल्याचे आढ...

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; रेकॉर्ड वरील गुन्हेगारास 4 तासात अटक

Image
  कराड : रेकॉर्ड वरील गुन्हेगारा समवेत तालुका पोलीस निरीक्षक महिंद्रा जगताप समवेत पोलीस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; रेकॉर्ड वरील गुन्हेगारास 4 तासात अटक  70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कराड दि, 2 (वार्ताहर) - संजय नगर शेरे ता. कराड येथे खुनाची धमकी देऊन जबरदस्तीने मोबाईल घेऊन पलायन केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने चार तासात जेरबंद करत 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विजय अभिमान सानप (वय 26) रा. जुळेवाडी ता. कराड असे या रेकॉर्डवरील संशियताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  संजयनगर शेरे ता. कराड गावचे हददीत कराड ते तासगाव जाणारे रोडचे कडेला असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट ऑफीस समोर रोडवर फिर्यादी हा त्याचा मोबाईल हातात घेऊन उभा असताना एक अनोळखी इसम मो. सायकल वरुन येवुन फिर्यादी यांना कानफाडीत मारून मोबाईल दे नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी देवून फिर्यादी यांचा मोबईल घेवुन तेथुन मोटार सायकल क्रमांक.एम. एच.50.जी 8044 वरुन पळुन गेल...

जनतेची दिशाभूल करणारा, पोकळ घोषणांचा अर्थसंकल्प;माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Image
जनतेची दिशाभूल करणारा, पोकळ घोषणांचा अर्थसंकल्प - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 1 - आपल्या देशाचा कृषी विभाग अत्यंत महत्वाचा घटक आहे. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचं कौतुक केलं परंतु शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या हमी भाव मिळण्याचा कायदा याबाबत काहीच घोषणा केली नाही. आजही राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. जर खर्चापेक्षा कमी उत्पन मिळालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार कसे ? याबाबत सरकारने ठोस घोषणा करणे अपेक्षित होते. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणारा व पोकळ घोषणांचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  टॅक्स बाबत केंद्र सरकारने आत्ताच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याबाबत देशातील जनतेला नक्कीच कुतहल वाढलेले आहे. याआधी कमीत कमी सात लाखापर्यंत कर द्यावा लागत नव्हता ती लिमिट वाढवून आता बारा लाख रुपये पर्यंत केली आहे. केंद्र सरकारने जी टॅक्समध्ये सूट दिलेली आहे  यामुळे महागाईने जे मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे त्याची भरपाई होईल असे काही वाटत नाही. लॉन्ग टर्म कॅपिटल कॅपिटल गेन्सवर सूट मिळायला हवी होती ती काह...

कृष्णा हॉस्पिटलमध्ये 'जी.बी.एस.'च्या रुग्णावर यशस्वी उपचार

Image
  कृष्णा हॉस्पिटलमध्ये 'जी.बी.एस.'च्या रुग्णावर यशस्वी उपचार एकास डिस्चार्ज तर अन्य तिघांवर उपचार सुरू; प्रकृतीत होतेय सुधारणा कराड, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'जी.बी.एस.' अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जी.बी.एस.च्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून, कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये एका जी.बी.एस.च्या रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून, अन्य तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.  गुइलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिजीज आहे. यामध्ये रुग्णाला विषाणू किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असल्यास हा आजार जडण्याची शक्यता वाढते. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही याची प्रमुख लक्षणे आहेत. वाळवा तालुक्यातील ३६ वर्षीय रुग्ण हाता-पायातील ताकद कमी झाल्याने गेल्या आठवड्यात कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी व अन्य चाचण्या केल्या असता त्याला या आजाराचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले.  त्यानंतर कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले ...