सह्याद्रिच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाचा 7 रोजी बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ
सह्याद्रिच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाचा 7 रोजी बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ
कराड, दि. 5 - यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिन 7 हजार 500 मे. टनावरून 11 हजार मे. टन विस्तारवाढ प्रकल्पामधील 150 टन/ प्रतितास क्षमतेच्या नवीन बॉयलरचा अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.00 वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Comments
Post a Comment