पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कराड नगर परिषदेच्या कलाकारांचे घवघवीत यश
पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची उत्तुंग कामगिरी; विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश
कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग नगरपरिषद प्रशासन संचलनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पुणे विभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सातारा जिल्ह्याने सर्वात जास्त पारितोषिके मिळविली असून त्यामध्ये कराड नगर परिषदेच्या कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
कराड नगर परिषद परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विभागाने घेतलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात ही मोठी कामगिरी करत अनेक पारितोषिके प्राप्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुणे विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पुन्हा कराड नगरपरिषदेच्या कर्मचारी कलाकारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगर अभियंता आर डी गायकवाड, आरोग्य अभियंता गिरीश काकडे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य व वेशभूषा स्पर्धेत मध्ये उदय विमल महादेव सातपुते यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वैयक्तिक चारोळी प्रथम क्रमांक - गणेश पांडुरंग जाधव, वैयक्तिक कविता वाचन तृतीय क्रमांक - अपर्णा महाजन, सामुहिक वेशभुषा प्रथम क्रमांक - रवि काटरे व रोहन जाधव, प्रगती भिसे, विनायक शिंदे, तुषार कांबळे, प्रशांत वाडीकर, रोहन महापुरे, सामुहिक नृत्य द्वितीय क्रमांक - सुनिता आठवले व आरती भोसले, निलम महापुरे, उषा कांबळे, ललिता मोरे, सुजाता भोसले, अनुराधा लादे, सीमा कांबळे, मनिषा कांबळे, रेशमा वायदंडे, सविता कांबळे शितल देवकुळे, प्रगती भिसे, पुष्पा बारशिंगे, कांचन बनसोडे सुजाता भोसले (पिंकी), अनिता वाघमारे, अभिजीत खवळे, सागर सातपुते, श्रीकांत कांबळे, भास्कर काटरे, शंकर भोसले (बापू), सोनू चव्हाण, संजय भोसले, प्रशांत वाडीकर, रोहन जाधव, रवि काटरे, उदय सातपुते, बाल कलाकार-विहान सातपुते, परी देवकुळे यांच्या ग्रुपने यश संपादन केले.




Comments
Post a Comment