त्याग अन् निष्ठेचे प्रतीक - आनंदराव पाटील (नाना)...
त्याग अन् निष्ठेचे प्रतीक - आनंदराव पाटील (नाना)...
त्याग, निष्ठा, सेवा, नाती सांभाळत समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून जनमानसात स्वतःची स्वच्छ प्रतिमा निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व, उत्कृष्ट समन्वयक, कर्तव्यनिष्ठ नेता, सर्वसामान्य नेतृत्व, सेवेचे विद्यापीठ, रचनात्मक कार्य, पीडितांचा मित्र म्हणून व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भक्कम आधारस्तंभ माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा आज बुधवार 19 रोजी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
आनंदराव पाटील (नाना) सामान्य कार्यकर्त्यांना नाना कधी विसरले नाहीत. सामान्य कार्यकर्ता हीच त्यांची खरी शक्ती आहे, याचे भान त्यांनी नेहमीच ठेवले आहे. असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे नाना हजारो युवकांच्या मनामनात आहेत. गोरगरीब कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता, कसल्याही संकटात धावून कार्यकर्त्यांना जपणारा तळमळीचा नेता अशी नानांची जनसामान्यात प्रतिमा निर्माण झालेली आहे.
नानांना सुरुवातीपासून सर्व राजकीय व शासकीय पदे मिळत गेली. त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग नानांनी सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी केला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना नानानी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पूर्वी धरणग्रस्त वस्तीमध्ये फक्त खडीकरण केले जायचे. परंतु त्यामध्ये पाठपुरावा करून त्यांनी शासन निर्णय बदलून घेतला. सर्व पुनर्वसित गावांचा 18 नागरी सुविधा तसेच खडीकरण व डांबरीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास महाराष्ट्र शासनास भाग पाडले. विधान परिषदेच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासकामे केली. मुंढे विजयनगर येथील 400 केव्ही व 220 केव्ही सबस्टेशन मध्ये शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्यामुळे त्या कुटुंबातील प्रत्येक मुलाला नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत विधान परिषदेमध्ये आवाज उठवला. त्यांना त्यात यश मिळाले.
सत्तेच्या काळात काही महत्वपूर्ण प्रकल्प आपल्या परिसरात व्हावे, यासाठी नानांनी खूप मेहनत घेतली. एम. एच 50 आरटीओ कार्यालय होण्यासाठी प्रस्तावाची व्यक्तीशः पूर्तता केली. विजयनगर व पाटण रस्त्याचा कायापालट झाला. स्थानिकांना छोटे-मोठे व्यवसाय निर्माण झाले. सामान्य कार्यकर्ते आनंदी झाले. आसपासच्या जमिनींचे दर वाढत गेले. सातार्याचे हेलपाटे वाचले. तरुणांना कृषी पदवी आपल्या तालुक्यात घेता यावी यासाठी नानांनी शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करून आणले व या दोन्ही प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना लागणार्या सुविधा निर्माण केल्या.
कोरोनाच्या काळात नानांनी आपल्या आमदार निधीतून रुपये दहा लक्ष मंजूर करून सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेंपरेचर मीटर, पीपीई किटसह मास्क व इतर साहित्याचे वाटप केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान नानांचा खरा लोकसंग्रह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या दोन्ही निवडणुकीत झोकून देत नानांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद आमदार अतुल बाबा भोसले व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी लावली. कराड दक्षिण मधील ऐतिहासिक बदलाचे ते स्वकर्तृत्ववाने साक्षीदार आहेत. आमदारकीच्या काळात अपूर्ण राहिलेले प्रकल्प, लोकोपयोगी प्रस्ताव आमदार अतुल बाबा भोसले व शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी ते धडपडत असतात व या त्यांच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेऊन त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांची मनोमन आशा आहे. अशा मोठ्या मनाच्या आनंदराव पाटील नाना यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
मोहनराव जाधव,
मा. संचालक पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा,
मा. उपसरपंच ग्रामपंचायत, सैदापूर





Comments
Post a Comment