ड्रग्ज तस्करी प्रकरणातील १२ जणांच्या पोलीस कोठडीत वाढ...
ड्रग्ज तस्करी प्रकरणातील १२ जणांच्या पोलीस कोठडीत वाढ...
कराड दि. 17 - एम.डी. ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या १२ जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज सोमवारी आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. ड्रग्ज प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून यामधील संशयितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमित घरत (रा. करांजडे, ता. पनवेल), दीपक सुर्यवंशी (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), बेंजामिन कोरु (रा. कोपरखैरणे नवी मुंबई), रोहित शहा (रा. शनिवार पेठ, कराड), सागना इ मॅन्युअल (रा. घणसोली, नवी मुंबई), नयन मागाडे (रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद देवरुखकर (रा. पावस्कर गल्ली, कराड), संतोष दोडमणी (रा. सैदापूर), फैज मोमीन (रा. मार्केट यार्ड, कराड), राहुल बडे (रा. सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम शेख (रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड), तौसीब बारगिर (रा. कार्वेनाका, कराड) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने ओगलेवाडी (ता. कराड) येथे छापा टाकून ड्रग्ज विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना अटक केले होते. त्यांच्याकडून दहा ग्रॅम ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची तीन वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. या पथकांनी दोन परदेशी नागरिकांसह आणखी ९ जणांना अटक केले. त्यांच्याकडून आणखी वीस ग्रॅम ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. सोमवारी या सर्व संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

Comments
Post a Comment