कराड नगरपरिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 प्रारंभ
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून विविध संघ दाखल
कराड, दि. 20 (प्रतिनिधी) - कराड नगरपरिषद आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात प्रारंभ झाला. मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून आठ संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास 25 हजार रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे.
आजपासून चार दिवस चालणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 स्पर्धेची तयारी कराड नगर परिषदेने केले आहे. आज पहिल्या दिवशी कराड नगरपरिषद, महावितरण कराड कर्मचारी, कृषी विभाग सातारा, पाटण टीचर्स, सार्वजनिक बांधकाम विभाग कराड, पाटबंधारे विभाग कराड, जिल्हा रुग्णालय सातारा, महावितरण वडूज या संघाने सहभाग घेतला होता.
आज सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या हस्ते नगर अभियंता आर डी गायकवाड, नगर अभियंता सूरज चव्हाण, आरोग्य अभियंता गिरीश काकडे, जल निसारण अभियंता संदीप रणदिवे, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, कराड अग्निशामक प्रमुख श्रीकांत देवघरे, लेखापाल मयूर शर्मा, गांधी ज्वेलर्सचे सुरज गांधी, उद्योजिका राधिका पन्हाळे,सक्सेस अबॅकस व वेदिक मॅथस्चे अभिजीत जाधव यांच्यासह नागरिक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment