स्व. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन; बाळासाहेब पाटील
विद्यानगर : सायन्स कॉलेज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मा. आ. बाळासाहेब पाटील, समवेत मान्यवर
स्व. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन; बाळासाहेब पाटील
जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती
कराड, दि. 21 (प्रतिनिधी) - येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळा (दि.२ फेब्रुवारी, २०२५ ते १ फेब्रुवारी, २०२६) विविध कार्यक्रमाने आयोजित केल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष व सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, अरुण पाटील (काका) सुनील पवार,नंदकुमार बटाणे, डॉ. सूर्यकांत केंगार,अशोक पोतदार उपस्थित होते.
जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १० मार्च, २०२५ रोजी कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा, एप्रिल, २०२५ मध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर, १ मे, २०२५ रोजी क्षेत्रभेट - देवराष्ट्रे, विरंगुळा, सौ वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, प्रीतीसंगम समाधी स्थळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड.
१ जून, २०२५ - रोजी ज्योत आगमन समारंभ (फलटण ते कराड), सुगमगीत गायन कार्यक्रम, जुलै, २०२५ - मध्ये महिला बचतगट एकदिवसीय कार्यशाळा व महिला बचतगट उत्पादन साहित्य प्रदर्शन, वृक्षारोपण, ऑगस्ट, २०२५ मध्ये - चित्रकला स्पर्धा आयोजन (माध्यमिक, उच्च माध्यमिक व खुला गट), सप्टेंबर, २०२५ मध्ये -जप साधना उपक्रम (कराड परिसरातील महिला) राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा (प्रतिवर्षी)
ऑक्टोबर २०२५ - मध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजन / रक्तदान शिबिर, २५ नोव्हेंबर २०२५ - रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धा आयोजन, डिसेंबर, २०२५ मध्ये 'ही ज्योत अनंताची' ग्रंथ प्रकाशन समारंभ व जात्यावरच्या ओवीसंग्रह प्रकाशन सोहळा, जानेवारी, २०२६ - मध्ये लोककला जागर कार्यशाळा, सौ. वेणूताई चव्हाण जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन (माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर).
१ फेब्रुवारी, २०२६ - जन्मशताब्दी सांगता समारंभ साठी प्रमुख अतिथी म्हणून मा. शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार असून यावेळी सौ वेणूताई चव्हाण विशेष स्मरणिका प्रकाशन सोहळा व वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये वेणूताई यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण सोहळा होणार आहे.
त्याचबरोबर वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथील प्राध्यापकांचे विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन तसेच वेणूताई इंग्लिश मीडियम स्कूल, कराड यांच्या वतीने विविध स्पर्धा, वृक्षारोपण, पालक महिला व्याख्यानमाला, हस्तकला प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व.सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण अल्प परिचय
जन्म 2 फेब्रुवारी, 1926. वडिलांचे नाव रघुनाथराव बाबुराव मोरे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार झाले होते. 2 जून, 1942 रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाणांबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या. सन 1942 ते 1947 या काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत छोडो' आंदोलनात यशवंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अनेक दिवस तुरुंगात रहावे लागले. आयुष्यात आलेल्या खडतर पपरिस्थितीला तोंड देत वेणूताईनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संसार समर्थपणे सांभाळला. सन 1952 मध्ये यशवंतराव चव्हाण यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून वेणूताई त्यांच्याबरोबर मुंबई येथील निवासस्थानी गेल्या. साहेब राजकीय जीवनात व्यस्त झाल्यानंतर त्यांनी वृद्ध सासूबाईसह सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. आणि अत्यंत आनंदाने त्यांनी ती यशस्वीरीत्या पारही पाडली. पुढे साहेब संरक्षण मंत्री उपपंतप्रधान झाल्यानंतर, त्यांच्याबरोबर दिल्ली येथे निवासस्थानी वेणूताईचे वास्तव होते.1 जून, 1983 रोजी त्या अनंतात विलीन झाल्या.

Comments
Post a Comment