सातारा जिल्हा पोलीस दलाने पटकावला छत्रपती शिवाजी महाराज चषक


कराड - मान्यवरांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज चषक विजेता सातारा पोलीस दलाचा संघ...

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या क्रिकेट संघाने पटकावला छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025

कराड नगरपरिषद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न...

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) - कराड नगरपरिषद आयोजित सातारा जिल्हयातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज चषक सातारा जिल्हा पोलीस दलाच्या संघाने पटकावला. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली चार दिवस या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता.

कराड - द्वितीय क्रमांकाचे बक्षीस व चषक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना  प्रायमरी टीचर्स कराडचा संघ...

कराड नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज चषक २०२५ बघ टेनिस स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे केलेले होते. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व्ही एन गांधी ज्वलर्सचे मालक सुरज गांधी यांच्या हस्ते व सक्सेस अॅबॅकस अॅन्ड वेदिक मॅथ्सच्या राधिका जाधव व अभिजीत जाधव, कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार, न्यू बिग मार्टचे प्रतिनीधी व तसेच कराड नगरपरिषदेचे पाणी पुरवठा जल निसःरण व स्वच्छता अभियंता संदिप रणदिवे, अग्नीशमन ऑफिसर श्रीकांत देवघरे व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कराड - तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस व चषक स्वीकारताना सातारा सिव्हील हॉस्पिटल सातारा ब्रदर्स संघ...

या सदर स्पर्धेचा शुभारंभ कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचे शुभ हस्ते व नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड , श्री. आरोग्य अभियंता गिरीष काकड, उद्यान विभाग प्रमुख सुधिर चव्हाण, लेखा विभाग प्रमुख मयुर शर्मा  तसेच स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सुरज गांधी व इतर सर्व प्रायोजक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. सदर स्पर्धेमध्ये सातारा जिल्हयातील विविध शासकिय निमशासकिय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या ३२ संघांनी सहभाग घेतला होता.
कराड - चौथ्या क्रमांकाचे बक्षीस व चषक स्वीकारताना पाटण टीचर्स संघाचे सदस्य...

या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक - सातारा जिल्हा पोलीस दल, द्वितीय क्रमांक प्रायमरी टिचर्स कराड, तिसरा क्रमांक सिव्हील हॉस्पिटल सातारा ब्रदर्स, चतुर्थ क्रमांक पाटण टिचर्स, पाटण तसेच स्पर्धेमधील बेस्ट बॅटसमन प्रशांत माने, बेस्ट बॉलर सागर मोरे, मॅन ऑफ दि सिरीजचा मानकरी ठरला प्रायमरी टिचर्सचा विक्रम कापसे.
कराड - बक्षिस वितरण समारंभ नंतर जल्लोष करताना....

या भव्य स्पर्धेतील चषक हे व्ही एन गांधी ज्वेलर्स यांनी दिले तर प्रथम क्रमांकाची बक्षिसाची रक्कम दि कराड अर्बन बँक कराड यांचे कडून देणेत आली. द्वतिीय क्रमांकाची रक्कम समिर पवार मित्र परिवार तर तृतीय क्रमांकाची रक्कम अभिजीत जाधव व राधिका जाधव सक्सेस अॅबॅकस अॅन्ड वेदिक मॅथ्स व चतुर्थ क्रमांकाची रक्कम अनिल कुमार व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा कराड यांच्या कडून देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. इतर सह प्रायोजक म्हणुन अंकुर फर्टिलीटी क्लनिक, न्यू बिग मार्ट मानव परिवर्तन व विकास बहुउददेशिय सेवाभावी संस्था, टि.व्ही.एस मंगाराम व विमल सातपुते फाऊंडेशन यांचेही ही मोलाचे सहकार्य लाभले.
कराड - छत्रपती शिवाजी महाराज चषक विजेत्या संघाबरोबर स्पर्धा आयोजन कमिटी प्रमुख मुकेश अहिवळे व त्यांचे सहकारी...

स्पर्धा यशस्वी करणेसाठी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, पाणी पुरवठा जल निसःरण व स्वच्छता अभियंता संदिप रणदिवे, अग्नीशमन ऑफिसर श्रीकांत देवघरे व उदय सातपुते यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी नगरपरिषदेचे वरिष्ठ मुकादम प्रमोद कांबळे, मुकादम अभिजीत खवळे, नारायण कांबळे, किशोर पवार, सागर सातपुते, विनोद काटरे, रवि काटरे, भारकर काटरे, समाधान पवार, कष्णा काटरे, सोनु चव्हाण, ऋषि लादे, रोहन जाधव, रवी चांदणे, प्रविण चव्हाण, श्रीकांत कांबळे, भगवान ढेकळे, मानव लादे, विनोद कसबे, महेंद्र काटरे, संभाजी भिस, सोनू वाघमारे यांच्यासह कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक