कराडच्या लिगाडे - पाटील कॉलेजचा साहिल लाडे जिल्ह्यात प्रथम
कराड : यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे यांच्यासह प्राध्यापक.कराडच्या लिगाडे - पाटील कॉलेजचा साहिल लाडे जिल्ह्यात प्रथम
जेईई मेन्स परिक्षेत गौरवास्पद कामगिरी; अन्य विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
कराड, दि. 14 - कराडमधील अग्रगण्य कॉलेज अशी ओळख असणाऱ्या लिगाडे पाटील कॉलेजच्या जेईई मेन्स २०२५ परिक्षेत साहिल लाडे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याने ९९.९२८ टक्के गुण मिळविले असून मानसी फाळके हिने सुद्धा ९९.२३४ टक्के गुण मिळवित गौरवास्पद कामगिरी केली आहे. देशभरात १२ लाख ५८ हजार १९६ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती आणि यात लिगाडे पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कराडकरांसाठी अभिमानास्पद आहे.
प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या साहिल लाडे व मानसी फाळके यांच्यासह श्रेयस कदम (९८.६७६) नवनाथ बजबले (९८.०६३), गौरी गोडसे (९६.९२३ अथर्व जाधव (९६.५०२), अनुराग पाधीन (९५.२३५) यांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कॉलेजमध्ये घेण्यात आला. प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे यांनी २००३ मध्ये सुरु केलेल्या क्लासेसचे २०१३ मध्ये शासकीय मान्यतेने लिगाडे पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये रूपांतर झाले.
या कॉलेजमधून जेईई मेन, जेईई डव्हान्स. नीट, एम एच-सीईटी केव्ही पीवाय परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मागील वीस वर्षाच्या कालावधीत कॉलेजमधून हजारो डॉकटर्स, इंजिनिअर्स व काही नामांकित प्रशासकीय अधिकारी तयार झाले आहेत. विशेष म्हणजे जेईई मेन्समध्ये यश मिळविलेले हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधून मराठी अथवा सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत. परंतु लिगाडे पाटील कॉलेजमधील शिक्षकांनी यांच्यातील बुद्धीमत्ता ओळखून त्यांना या यशापर्यंत पोहोचवले आहे.
कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील, उपाध्यक्ष प्रा. विजय लिगाडे, व्यवस्थापक राव, प्राध्यापक सागर जिम्मी, मुकेश, राजकुमार, गायकवाड भोईटे सदाशिव, गवळी, मनोज विशाल, देशमुखे प्रधान, जितेश यांच्यासह प्राध्यापक वगनि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment