कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन
कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन.
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचा सिद्धांत रुजवणारे सेवावृत्ती पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू पाटसकर यांच्या माध्यमातून विकासपर्व जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ शनिवार दि. 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनुसार समाजात विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू पाटसकर यांच्या माध्यमातून विकास पर्व जनसेवा कार्यालयाच्या शुभारंभ होत आहे. भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस व युवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विष्णूकाका पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व मुंबई विधानपरिषदचे आमदार विक्रांत पाटील (दादा), कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, माजी कामगार मंत्री सुरेश खाडे, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सातारा जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम वरद विनायक संकुल लाहोटी कन्या शाळे शेजारी गुरुवार पेठ कराड या ठिकाणी होणार आहे.

Comments
Post a Comment