कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; रेकॉर्ड वरील गुन्हेगारास 4 तासात अटक

 

कराड : रेकॉर्ड वरील गुन्हेगारा समवेत तालुका पोलीस निरीक्षक महिंद्रा जगताप समवेत पोलीस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; रेकॉर्ड वरील गुन्हेगारास 4 तासात अटक 

70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कराड दि, 2 (वार्ताहर) - संजय नगर शेरे ता. कराड येथे खुनाची धमकी देऊन जबरदस्तीने मोबाईल घेऊन पलायन केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने चार तासात जेरबंद करत 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विजय अभिमान सानप (वय 26) रा. जुळेवाडी ता. कराड असे या रेकॉर्डवरील संशियताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  संजयनगर शेरे ता. कराड गावचे हददीत कराड ते तासगाव जाणारे रोडचे कडेला असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट ऑफीस समोर रोडवर फिर्यादी हा त्याचा मोबाईल हातात घेऊन उभा असताना एक अनोळखी इसम मो. सायकल वरुन येवुन फिर्यादी यांना कानफाडीत मारून मोबाईल दे नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी देवून फिर्यादी यांचा मोबईल घेवुन तेथुन मोटार सायकल क्रमांक.एम. एच.50.जी 8044 वरुन पळुन गेले ची घटना घडली होती.  उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्या बाबत सुचना दिल्या होत्या.

दरम्यान कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उपनिरीक्षक श्री. साक्षात्कार पाटील तसेच डी.बी पथक पेट्रोलींग करीत असताना शेरे ता. कराड गावचे हददीत शेणोली स्टेशन ते रेठरे कारखाना जाणारे रोडवर एक संशयीत इसम हा एम.एच.50 जी 8044 या नमुद गुनहयात वापरलेल्या मोटारसायकल वरुन जाताना दिसला. त्याच त्याच वेळेस पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता विजय अभिमान सानप (वय 26) रा- जुळेवाडी ता. कराड असे नाव त्याने पोलिसांना सांगितले व गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन सदर गुन्हयात 35,000/- रुपये किंमतीचे दोन मोबईल व 35,000/- किंमतीची एक मोटारसायकल असा एकुण 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अभिजीत चौधरी हे करीत आहेत.

वरील कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत चौधरी, पोउनि. साक्षात्कार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार उत्तम कोळी, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, पोलीस नाईक सज्जन जगताप, पोलीस नाईक किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल मोहित गुरव, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुरज चिंचकर, यांनी केली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक