कराड नगरीचे शिल्पकार ; आदरणीय स्व. पी.डी.पाटील जयंती विशेष लेख......
कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय पी.ङी.पाटील साहेबांची आज जयंती..... साहेब म्हणजे यशवंतांचा विचार ,तरूणांसाठी ज्ञानरूपी आशिर्वाद, दुरदृष्टी, अंधाराकङुन प्रकाशाकङे नेणारे लोक नेते, समाजाभिमुख नेतृत्व, शेतकरयांचे कैवारी, जनसामान्यांचा आधार, साहेब म्हणजे सर्वांसाठी एक आदरणीय वंदनीय व्यक्तीमत्व, एक नवी दिशा, विकासाचा महामेरू. साहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. स्वकर्तृत्वाने ते वकिल झाले. त्याकाळी कराङ शहर आणि तालुक्यात अगदी मोजकेच कायदेतज्ञ होते त्यापैंकी एक आपले साहेब. वकिली करत असताना ते राजकारणात आले.1953 सालापासून ते 1996 सालापर्यंत त्यांनी कराङ शहराचे नगराध्यक्षपद भुषविले आणि अशाप्रकारे सलग 43 वर्षे नगराध्यक्ष पद भुषवुन त्यांनी जगामध्ये एकप्रकारे विक्रमच प्रस्थापित केला. सलग 43 वर्षे लोकांना कसल्याही प्रकारचे आमिष न दाखवता आपल्या भोवती ठेवणे, आपल्या विचारांशी सहमत ठेवणे आणि आपलस करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हतीच पण त्याचबरोबर यासाठी अंगी प्रतिभावंतपणा असावा लागतो आणि तो साहेबांकङे होता. तसेच जनतेच्या आणि साहेबांमधे एक दुवा होता तो म...