ज्येष्ठ इतिहास संशोधक कराड भूषण प्रा.का.धो.देशपांडे यांचे निधन...
ज्येष्ठ इतिहास संशोधक कराड भूषण प्रा.का.धो.देशपांडे यांचे निधन...
कराड दि.26-(प्रतिनिधी) ज्येष्ठ इतिहास संशोधक कराडभूषण प्रा.का.धो.देशपांडे (काशिनाथ धोंडो देशपांडे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.ते ९१ वर्षांचे होते.कराड शहराचा समग्र इतिहास असलेल्या "कराड समग्र दर्शन"या पुस्तकाचे का.धो.देशपांडे व प्रा.विद्याधर गोखले यानी संशोधन आणि संपादन केले होते.समाजभूषण पद्मश्री बाबुराव गोखले स्मारक समिती, विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे सदस्य, भ्रमण मंडळाचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.वेणूताई चव्हाण महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून पस्तीस वर्षे सेवा केली. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधनाची फार मोठी हानी झाली.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.आज सायंकाळी कराड येथे वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Comments
Post a Comment