महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा खेळ सुरू असतानाच ईडीची नोटीस...
महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा खेळ सुरू असतानाच ईडीची नोटीस...
मुंबई दि.27-महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा खेळ सुरू असतानाच संजय राऊत यांना ईडीची नोटीस दिली गेली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्राचाळ जमीन प्रकरणाशी संबंधावरून चौकशीची नोटीस देण्यात आली आहे. उद्या ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश आहेत. याआधी संजय राऊत यांची काही संपत्ती ईडीने जप्त देखील केली आहे.
संजय राऊत यांना ईडी ने उद्या 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. राज्य सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न होता कामा नाये म्हणून भाजप चा डाव आहे असेच दिसतंय अशी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
या मला अटक करा!-खा.संजय राऊत...
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या मला अटक करा!
जय महाराष्ट्र!
दरम्यान आज महाराष्ट्रातील राजकीय बंड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू ॲड हरीश साळवे तर शिवसेना पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांची बाजू ॲड कपिल सिब्बल व ॲड अभिषेक मनू सिंघवी मांडत आहेत.

Comments
Post a Comment