चिमुरड्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा;नागरिकांची मागणी....
शहारातील भटक्या कूत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, चिमुरड्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा;नागरिकांची मागणी....
कराड दि.28 (प्रतिनिधी) शहरानजीकच्या वाखान परिसरात काल तीन वर्षाच्या चिमुकल्या राजवीर ओव्हाळ याच्यावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत आज कराड शहरातील नागरिकांनी तसेच दक्ष कराडकर यांच्यावतीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व संबंधित निष्पाप मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मोकाट कुत्र्यांपासून आबालवृध्दांचे रक्षण करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कराड नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दक्ष कराडकर यांच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काल वाखान परिसरात राजवीर ओव्हाळ या तीन वर्षाच्या बालकाचा भटक्या कुत्र्यांनी जीव घेतला. ही फार दुर्दैवी घटना घडली असून याला जबाबदार कोण? अलीकडच्या काळात कुत्र्यांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटना भरपूर घडलेल्या आहेत. वेळोवेळी त्या प्रशासनास निदर्शनास आणून ही दिलेल्या आहेत.
प्रशासनाने थोड्याफार प्रमाणात प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परंतु पूर्ण प्रतिबंध आजपर्यंत झालेला नाही.त्यामुळे शहरातील व परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा इथून पुढे शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले झाल्यास प्रशासनास दोषी धरून संबंधितांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे आपण या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करावी. असे ही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रमोद पाटील, सौरभ पाटील, गणेश पवार, नवाज सुतार, प्रताप इंगवले, सुनील पाटील, सुनील शिंदे, अशोकराव पाटील, संजय चव्हाण, समाधान चव्हाण, अख्तर आंबेकरी, राहुल चव्हाण रुपेश मुळे, अमरसिंह पाटील जयंत बेडेकर, प्रबोद पुरोहित, संदीप शेंडे, जावेद नायकवडी विजय वाटेगावकर यांनी सह्या केल्या आहेत.
दरम्यान कराड शहरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजवीर ओव्हाळ या मुलावर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. या निष्पाप मुलाच्या मृत्यूस सर्वस्वी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. कराडकर नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत समक्ष व निवेदनावाद्वारे नगरपरिषदेस वेळोवेळी मागणी केली होती, परंतु या मागणीकडे नगरपरिषदेने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे.
नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे, त्यामुळे या मुलाच्या खुनास सर्वस्वी नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. शहरात शेकडो मोकाट कुत्री टोळक्यांनी फिरत असतात ती लहान मुलांवर व महिलांवर, वृद्धांवर रस्त्याने जाताना हल्ला करत असतात. तसेच वाहन चालकांचे मागे झुंडीने लागत असतात, त्यामुळे गंभीर अपघात झालेले आहेत व होऊ शकतात.त्यामुळे पून्हा एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी संपूर्ण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व शहर मोकाट कुत्र्यांपासून मुक्त करावे .
या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.या सर्व प्रकरणास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदन माहितीसाठी मुख्यमंत्री, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख, कराड मुख्याधिकारी यांना ही दिलेले आहे. या निवेदनावर जयवंत पाटील, विजय वाटेगावकर, रणजीत पाटील, सागर पाटील, अनिकेत सूर्यवंशी, संजय चव्हाण, संदीप व्हावळ, प्रताप इंगवले, नवाज सुतार, महेश अलकुंटे, अशोक पाटील, गणेश पवार, इंद्रजीत भोपते, अशोक पवार, राहुल चव्हाण, वैभव पाटील, प्रमोद पाटील, सुनील शिंदे, सौरभ पाटील, प्रवीण पवार, समाधान चव्हाण यांच्या सह्या आहेत.
Karad Today News कराड टूडे न्यूज ब्लाॅग वरील मजकूर, बातमी, फोटो काॅपी करुन कूणी सोशल मिडियावर (व्हाॅटसप, फेसबूक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हाॅटसप ग्रूप), न्यूज वेब पोर्टल, आॅनलाईन न्यूज नेटवर्क, साप्ताहिक, मासिक, दैनिक, यू-ट्यूब चॅनेल वर वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मात्र कराड टूडे न्यूजची लिंक आहे अशी शेअर करू शकता)


Comments
Post a Comment