प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई;मूर्तीकार आंदोलनाच्या पावित्र्यात.......

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.)मुर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई;मूर्तीकार आंदोलनाच्या तयारीत...

सातारा दि. 27 : सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील  जल आणि वायु प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असल्याने पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदुषण आणि पर्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार प्रतिबंध करण्यात येत असल्याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये पी.ओ.पी.  (प्लास्टर ऑफ पॅरीस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मुर्ती उत्पादन, वितरण व खेरदी-विक्री करण्यावर दि. 6 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येत आहे. ज्या मुर्तीकारांकडे पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मुर्ती असतील त्यांना दि. 5 जुलै 2022 पर्यंत त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविण्यास, वितरण करण्यास, आयात करण्यास दि. 6 जुलै 2022 पासून प्रतिबंध करण्यात येत असल्यामुळे यानंतर पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व  प्रकारच्या मुर्ती तयार करणाऱ्या, विक्री करणाऱ्यास तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने  तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याकरिता स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी (नगरपालिका व ग्रामापंचयात) पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत उप-प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा आणि पर्यावरण विषयक कामकाज करणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी यांच्या पथकाची निर्मिती केली आहे.

दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना घातलेल्या बंदी वरून सातारा जिल्ह्यातील विशेष करून कराड परिसरातील मूर्तिकारांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून मोठ्या संख्येने ही मूर्तिकार जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती मिळाली आहे.बहूतांशी मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवल्या असून त्यांच्यापूढे या आदेशाने मोठा पेच निर्माण झाला आहे.आता यावर काय तोडगा निघतो हे पाहवे लागणार आहे.

                                          

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक