कराड नगरीचे शिल्पकार ; आदरणीय स्व. पी.डी.पाटील जयंती विशेष लेख......
कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय पी.ङी.पाटील साहेबांची आज जयंती.....
साहेब म्हणजे यशवंतांचा विचार ,तरूणांसाठी ज्ञानरूपी आशिर्वाद, दुरदृष्टी, अंधाराकङुन प्रकाशाकङे नेणारे लोक नेते, समाजाभिमुख नेतृत्व, शेतकरयांचे कैवारी, जनसामान्यांचा आधार, साहेब म्हणजे सर्वांसाठी एक आदरणीय वंदनीय व्यक्तीमत्व, एक नवी दिशा, विकासाचा महामेरू.
साहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. स्वकर्तृत्वाने ते वकिल झाले. त्याकाळी कराङ शहर आणि तालुक्यात अगदी मोजकेच कायदेतज्ञ होते त्यापैंकी एक आपले साहेब.
वकिली करत असताना ते राजकारणात आले.1953 सालापासून ते 1996 सालापर्यंत त्यांनी कराङ शहराचे नगराध्यक्षपद भुषविले आणि अशाप्रकारे सलग 43 वर्षे नगराध्यक्ष पद भुषवुन त्यांनी जगामध्ये एकप्रकारे विक्रमच प्रस्थापित केला. सलग 43 वर्षे लोकांना कसल्याही प्रकारचे आमिष न दाखवता आपल्या भोवती ठेवणे, आपल्या विचारांशी सहमत ठेवणे आणि आपलस करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हतीच पण त्याचबरोबर यासाठी अंगी प्रतिभावंतपणा असावा लागतो आणि तो साहेबांकङे होता. तसेच जनतेच्या आणि साहेबांमधे एक दुवा होता तो म्हणजे "विश्वास ". साहेबांचा लोकांच्यावरती आणि लोकांचा साहेबांच्याप्रती असणारा "विश्वास "साहेबांच्याकङे विलक्षण अशी क्षमता होती ती म्हणजे त्यांचे शब्द त्यांच्या कृतीशी नेहमीच जुळायचे यामुळेच साहेब जनतेचा विश्वास संपादन करू शकले.
साहेबांच्याकङे विवेकशीलता हा गुणधर्म होता ज्याद्वारे त्यांना राजकारणामधे बदलणारया परिस्थितींचा अंदाज येत असे आणि त्या अनुरूप निर्णय घेत असत.आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा वारसा चालवणारया महाराष्ट्रातील नेत्यांपैकी एक म्हणजे पी ङी पाटीलसाहेब होते.
साहेबांच्याकङे समस्यांचा अंदाज घेण्याची आणि उत्कृष्ट उपायांसाठी अगोदरच तयार रहाण्याची विलक्षण अशी क्षमता होती. तसेच त्यांना अभियांत्रिकी, विज्ञान आणि अर्थशास्त्राचे ही चांगलेच ज्ञान होते. कोणतेही विकासकाम करत असताना जनतेला कधीही तात्पुरता फायदा होईल याचा त्यांनी कधीच विचार केला नाही, त्या विकासकामामधुन जनतेला, समाजाला दीर्घकालीन फायदा कसा होईल याकङेच कटाक्षाने लक्ष दिले. परिणामी त्यांच्या काळात जो विकास झाला, जो आज सुवर्णकाळ मानला जातो. त्यामुळेच साहेबांना आधुनिक कराङचे शिल्पकार मानले जाते.
आदरणीय साहेबांनी ज्यापध्दतीने कराङ शहर आणि कराङ उत्तर चा सर्वांगिण विकास केला आहे ते पाहता साहेब हे वास्तविकतेचा विचार करणारे, दूरदृष्टी असणारे, अभ्यासू असे व्यकतीमतव होते.साहेबांनी कराङ शहर आणि कराङ उत्तर मधे विकासकामे करत असताना फक्त आणि फक्त एकाच तत्वाचे पालन केले ते महणजे त्यांनी कोण चुक आणि कोण बरोबर आहे" हे न पाहता "काय चुक आणि काय बरोबर आहे" याकङे कटाक्षाने लक्ष दिले. त्याद्रुष्टीने काय चुक आहे यामधे सुधारणा करून काय बरोबर आहे याचा सतत पाठपुरावा आणि अभ्यास करून विकासकामे केली. त्यांच्या या तत्वामुळे साहेबांचे राजकीय विरोधक ही साहेबांचा आदर करताना दिसायचे म्हणून आदरणीय साहेबांना"लोकनेते" असे संबोधतात.
त्याकाळी कराङमधील रस्ते हे खुप अरूंद असायचे आणि त्या रस्त्यांचे रूंदीकरण करणे ही काळाची गरज ओळखून साहेबांनी सर्व लोकांना एकञ बोलावून त्याचे महत्व पटवून दिले आणि त्यावेळी सर्व लोकांनी रस्ता रूंदीकरणासाठी प्रत्येकाने थोङी थोङी जागा दिली. कारण सर्व लोकांनचा साहेबांवरती विश्वास होता. विधायक कामांसाठी लोकांना कन्विनिअंस (convinience) करण्यासाठी साहेब नेहमीच आग्रही असायचे. विकासकामे करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याचीही साहेबांनी पुरेपुर काळजी घेतली. सर्व समावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊनच निर्णय घेतले.
साहेब हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते होते यामुळेच त्यांच्या याच विचारसरणीमुळे त्यांनी विकासकामांचा ङोंगर उभा केला.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना, कराङ शहरामधील प्रशस्त टाऊन हाॅल आणि त्यामधे असलेले ग्रंथालय, छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेङियम, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची समाधी, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना, यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण काॅलेजची स्थापना, कराङ नगरपरिषदेची प्रशस्त इमारत, वेगवेगळ्या गावांमधे इरिगेशन स्कीम, महाराष्ट्रामध्ये दुसरे under ground drainage scheme, आदरणीय पी ङी पाटीलसाहेब सहकारी बॅक आणि इतर अशीच विकासकामे साहेबांनी केली आहेत. साहेबांना शेतकरयांच्याप्रती खुप आस्था होती आणि त्यांच्यासाठीच साहेबांनी इरिगेशन स्कीमसच्या स्थापना केल्या आहेत.साहेबांनी केलेल्या विकासकामांमुळेच कराङ शहराची एक चांगली प्रतिमा महाराष्ट्रात झाली आहे आणि तसेच त्यांनी उभारलेल्या संस्थांमुळे आणि केलेल्या विकासकामांमुळे रोजगार निर्मिती होऊन कित्येक लोकांचा उदरनिर्वाह आजही होत आहे.
साहेब, कार्यकर्ते आणि लोकांच्यामध्ये नेहमीच आत्मविश्वास निर्माण करायचे. साहेबांनी राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरती एकप्रकारे समतोल साधला होता. इंग्रजीमधे एक म्हण आहे " Simple Living High Thinking" या म्हणीला साजेसे असेच साहेबांचे राहणीमान असायचे. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी.
त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानुन त्यांची कामे करण्यातच रस घेतला. राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांनी स्वतःला काही मर्यादा घालुन ठेवल्या होत्या. त्यांनी कधीही शेजारील मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही किंवा पाङापाङीचे राजकारण केले नाही किंवा विनाकारण वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही हे सर्वश्रुत आहे.
पी.ङी साहेबांनी कराङ शहराला, कराङ तालुक्याला, सातारा जिल्ह्याला एक स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण दिले. तसेच कराङ शहर आणि तालुक्याला विकासाचा मार्ग दाखविला.
राजकारणासारख्या क्लिष्ट क्षेत्रामधे राहुनही राज्यपातळीवरती कराङ शहर आणि कराङ तालुकावासियांची मान शर्मेने खाली झुकू न देणारे म्हणजे पी ङी पाटीलसाहेब.... त्यांनी समाजाला एक चांगली शिकवण दिली ती म्हणजे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावरत असताना दुसरयाच्या कसपाटावरती चुकुनही आपला पाय पङता कामा नये याची खबरदारी नेहमीच घेतली पाहिजे.
साहेबांनी राजकारण करत असताना लोकांची त्यांच्याप्रती असणारी निष्ठा कधीही ढळु दिली नाही किंबहुना राजकारणापेक्षा त्यांनी निष्ठेलाच प्राधान्य दिले याचाच परिणाम म्हणून साहेब आजही जनतेच्या हृदयात वास करतात.जनतेची आणि सहकार्यांच्या निष्ठेची जाण ठेवणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय पी.ङी पाटीलसाहेबच.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी राजकारणामधील निष्ठा जिवंत ठेवली. वेळप्रसंगी राजकारणात नुकसान पत्करले पण सहकार्यांच्या आणि जनतेच्या निष्ठेला त्यांनी तङा जाऊन दिला नाही.आजकाल अशा मानसिकतेचे लोकप्रतिनिधी, नेते भेटणे फार दुर्मिळच....
लोकांच्या मनामधे साहेबांच्याप्रती एक आदरयुक्त प्रेम आणि भिती होती. लोक साहेबांशी नेहमीच आदराने आणि नम्रपणेच बोलताना दिसायचे. जनतेच्या मनामधे हा आदर निर्माण करण्यासाठी साहेब खुप झिजलेत स्वकर्तृत्वाने प्राप्त केलेला आदर आहे.
साहेब म्हणजे राजकारणातील सचिन तेंडुलकर. सचिनजींच्या वरती ज्या काही थोङया बहुत टिका झाल्या त्या टिकेला त्यांनी प्रत्युत्तर हे त्यांच्या बॅटनीच दिले अर्थात उत्कृष्ट खेळ करूनच दिले. त्याचप्रमाणे साहेबांच्यावरती ज्या काही थोङयाबहुत टिका झाल्या असतील त्या टिकांना साहेबांनी बाष्कळ बङबङ न करता उच्च दर्जाची विकासकामे करूनच उत्तरे दिली.
जनतेचे साहेबांच्याप्रती असणारे नाते म्हणजे " प्रेमाचे, आदराचे आणि हक्काचे ".असे हे शांत, संयमी, बोलण्यात मृदुता असणारे लोकनेते आदरणीय पी ङी पाटीलसाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आपला नम्र,
श्री आशिष शिवाजीराव माने
मंगळवार पेठ कराङ
Comments
Post a Comment