देशात आज 11 हजार 793 कोरोना बाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे....


 सातारा जिल्ह्यात 15 बाधितांची वाढ झाली...

कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार...

नमूने-चाचणी-  322  (एकूण-25 लाख 89 हजार 651)

आज बाधित वाढ-   15  (एकूण-2 लाख 78 हजार 702)

आज कोरोनामुक्त-   14  (एकूण-2 लाख 71 हजार 940)

आज मृत्यू-  1 (एकूण-6 हजार 687)

सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-64

रूग्णालयात उपचार -3

महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ-  3 हजार 482

आज कोरोनामुक्त-  3 हजार 566

आज मृत्यू- 5

सध्या उपचारार्थ रूग्ण- 25 हजार 481

देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ- 11 हजार 793

आज कोरोनामुक्त-  9 हजार 486

आज मृत्यू- 27

सध्या उपचारार्थ रूग्ण-96 हजार 700

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र....

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले आहे.

आगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जातात. या सणांसाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरूद्ध लढणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पाच कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या कलमांतर्गेत राज्यांनी कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक