कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा...
कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा...
कराड, दि.28 : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पार पडला. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी योगासने केली.
आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत असून, त्यावर योग-प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमित योग गरजेचा असून, याबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. कृष्णा अभिमत विद्यापीठात योग प्रशिक्षक महालिंग मुंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने केली.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, दंतविज्ञान अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपी अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment