कराडात मोकाट कूत्र्यांच्या हल्ल्यात चिमूकल्याचा मृत्यू....
कराडात मोकाट कूत्र्यांच्या हल्ल्यात चिमूकल्याचा मृत्यू....
कराड दि.27-कराडच्या वाखाण भागात जगताप वस्तीनजीक आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजवीर राहूल ओहाळ (वय 3) असे या मूलाचे नाव आहे.संबंधित जखमी मुलास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओहाळ कुटुंबीय मोलमजुरी करण्यासाठी वाखाण परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. आई-वडील कामावर गेल्यानंतर राजवीर हा त्यांचा मुलगा इतर मुलांच्या व त्याच्या बहिणी सोबत खेळत असताना आमराईबन परिसरात मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कूत्र्यांनी राजवीरला अक्षरशा ऊसाच्या शेतात फरपटत नेले.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. अचानक राजवील दिसेनास झाल्याने आई वडीलांनी शोध घेतला असता.ऊसात त्यांना कूत्र्यांची हलचाल जाणवली.त्यानंतर कूत्र्यांना हाकलून राजवीरला तेथिल नागरिकांनी तातडीने त्यास कॉटेज हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री त्रास देत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले.
Comments
Post a Comment