वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून वृध्दाश्रामास मदतीचा हात...
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून वृध्दाश्रामास मदतीचा हात...
कराड दि.29-(प्रतिनिधी) वाढदिवस म्हटलं की आपण पाहतो अनेक जण वायफळ व नाहक खर्च करतात. फटाक्यांची आतषबाजी, जेवणावळी,पार्ट्या करतात. परंतु समाजात काही जण असे ही आहेत की वायफळ खर्च करण्याऐवजी समाजातील गरजू, गरीब यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना मदतीचा हात देतात. अशीच मदत समाजसेवेची आवड असणार्या व ज्ञानदानाचे कार्य करणार्या स्वप्नाली आनंदा चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदलापूर येथील शंभूरत्न परिवर्तन फाउंडेशन संचलित वृद्धाश्रमास विविध साहित्य देऊन मदत केली आहे.यावेळी वृध्दाश्रमातच स्वप्नाली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आपल्या वाढदिवसाचे निमित्ताने कोणता ही वायफळ खर्च न करता स्वप्नाली आनंदा चव्हाण यांनी नांदलापूर येथील शंभूरत्न परिवर्तन फाउंडेशन संचलित वृद्धाश्रमातील वृद्ध, निराधार व गरजूंना लागणाऱ्या साहित्याचे (ब्लॅंकेट, शाल, चटई) अशा साहित्यांचे कुटूंबियांसमवेत वाटप केले. स्वप्नाली या खाजगी क्लासेस घेतात. मुलांना प्रशिक्षित करतात.शिवाय त्यांना समाजसेवेची आवड आहे. याच उद्देशाने त्यांनी वृद्धाश्रमातील लोकांना मदत करण्याचे ठरवले. वाढदिवसा दिनी अनेकजण लाखो रुपये खर्च करतात परंतु स्वप्नाली यांनी आई-वडिलांच्या आशीर्वादाने गरजू आणि समाज सेवेसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्याचे ठरविल्याने त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील लोकांना मदत केली. यावेळी शितल माळी, आनंदा चव्हाण, अनिता चव्हाण धनंजय कणसे, लक्ष्मण दूपटे, तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment