कृष्णा फार्मसी महाविद्यालयात पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्र....
कृष्णा फार्मसी महाविद्यालयात पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्र....
कराड, ता. २८ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे डी. फार्मसीसह अन्य पदविका अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनामार्फत ठिकठिकाणी सुविधा केंद्र सुरू केली असून, येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा फार्मसी महाविद्यालयाला सुविधा केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.
शैक्ष्रणिक वर्ष २०२१-२२ साठी औषधनिर्माण शास्त्र (डी.फार्म) या १२ वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला नुकताच प्रारंभ झालेला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे तपासणी आणि अर्ज निश्चितीकरणासाठी ई-स्क्रुटनी म्हणजेच अर्ज भरण्यापासून तो निश्चित करणे हे सर्व ऑनलाईन करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे तपासणी, अर्ज निश्चित करणे तसेच विकल्प भरणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ८ जुलैपर्यंत हे सुविधा केंद्र सुरू राहणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या केंद्राचे समन्वयक प्रा. अभिजीत कचरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment