Posts

Showing posts from October, 2022

कराडच्या तहसिलदार कचेरीत 50 हजाराची लाच मागणारा जेरबंद...

Image
  कराडच्या तहसिलदार कचेरीत 50 हजाराची लाच मागणारा जेरबंद... कराड, दि. 31 (प्रतिनिधी) कुणबी असल्याचा दाखल्याचे काम संबंधित अधिकार्‍याकडून करून देतो असे सांगून 50 हजार रूपये लाच मागितल्या प्रकरणी कराड तहसील कार्यालयातील लोकसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रम वसंत शिवदास (वय 43), मूळ रा. मालखेड सध्या रा. ढेबेवाडी फाटा मलकापूर असे कारवाई केलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याबाबतची सबंधित विभागाकडून मिळालेल्या माहिती नूसार, तक्रारदार यांचे भाचीचा तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांना सांगून कुणबी जातीचा दाखला काढून देतो असे सांगून स्वतःकरीता व संबंधित अधिकारी यांचे करीता 50 हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. त्यानूसार लाचखोर सेवकावर कराड शहर पोलिस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार संजय कलगुडगी, धनंजय खाडे, प्रितम चौगुले...

सांगोल्यात वारकर्‍यांच्या पायी दिंडीत कार घुसली;कोल्हापुरातील 7 जणांचा मृत्यू...

Image
सांगोल्यात वारकर्‍यांच्या पायी दिंडीत कार घुसली;कोल्हापुरातील 7 जणांचा मृत्यू... सोलापूर दि.31- पंढरपुरला कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे पायी दिंडी निघाली होती. ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथून जात असताना दिंडीत पाठीमागून कार घुसली. यामुळे झालेल्या अपघातात 7 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी 7 वाजता ही पायी दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक MH 13 DE 7938 ही दिंडीत घुसली. वारकऱ्यांना चिरडत कार पुढे जाऊन थांबली. यात आठ वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत कार घुसल्यानंतर समोर आलेल्या प्रत्येकाला चिरडत कार पुढे गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील  32 वारकरी या पायी दिंडीत होते. यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला, 2 पुरुष यांचा समावेश आहे. यामध्ये शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव...

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 326 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली...

Image
  सातारा जिल्ह्यात आज 0 बाधिताची नोंद ... कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात एक ही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. तर आज दिवसभरात 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 सक्रिय रूग्ण असून 2 रूग्णांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. नमूने-चाचणी-21 (एकूण-26 लाख 26 हजार 667) आज बाधित वाढ- 0 (एकूण-2 लाख 80 हजार 758) आज कोरोनामुक्त- 6 (एकूण-2 लाख 73 हजार 908) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-4 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -2 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 326 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 1 हजार 731 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 8 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 17 हजार 912 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

टेंभू खोडशी नंतर कराडात मगरीचे दर्शन....

Image
  टेंभू खोडशी नंतर कराडात मगरीचे दर्शन;सैदापूर परिसरात दिसली मगर.... कराड दि.31 (प्रतिनिधी) टेंभू खोडशी नंतर आता कराडच्या सैदापूर पावकेश्वर मंदिरा नजीक कृष्णा नदीपत्रात मगरीचे दर्शन झाल्याने सैदापूर परिसरात खळबळ माजली आहे. ही मगर सैदापूरच्या स्मशानभूमीपासून पावकेश्वर मंदिराच्या परिसरात कृष्णा नदीत वावरताना अनेकांनी पाहिली आहे. आज या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.सदर व्हिडोओची खात्री केली असता या परिसरात मगरीने वारंवार दर्शन दिल्याची नागरिकांनी सांगितले. गत महिन्यात टेंभू धरणाच्या परिसरात मोठ्या मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर टेंभू ग्रामस्थांनी या ठिकाणी खबरदारी व सूचना फलक लावून जनजागृती केली होती. त्यानंतर चार दिवसात खोडशी गावाच्या प्रवेशद्वारावर नदीतील मगरीने ओढ्याच्या माध्यमातून येऊन गावातील चौकात दर्शन दिले होते. त्यामुळे गावात खळबळ माजली होती. गावातील नागरिकांच्या मागणीनुसार या मगरीचा वनविभागाने बंदोबस्त केला होता. दरम्यान कराड शहरात आज सकाळपासून सोशल मीडियावर सैदापूर परिसरात वावरत असलेल्या मगरीचा व्हिडिओ अनेक व्हाट्सअप ग्रुप वर निदर्शनास आल्याने याबाबतचे चर्चा स...

कराडच्या रिक्षा चालकावर विद्यानगरमध्ये कोयता-चाकूने हल्ला...

Image
  कराडच्या रिक्षा चालकावर विद्यानगरमध्ये कोयता-चाकूने हल्ला... कराड दि.31 (प्रतिनिधी) विद्यानगर येथे भर वस्तीत कराड शहरातील एका रिक्षा चालकावर तीन जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी विद्यानगर येथिल होली फॅमिली स्कूल नजीक घडल्याने त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली होती, त्याचा परिणाम म्हणून कराडत ही मंडई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वरिष्ठ पो.नि.बी.आर.पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त या परिसरात तैनात केला होता. हल्लेखोर फरार झाले असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की काल आयुब दिलावर कागदी (वय 39) रा. गूरुवार पेठ हा रिक्षातून भाडे घेऊन होली फॅमिली या ठिकाणी गेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी बबलू माने (आबा) याचा मुलगा शिवराज माने याचे गचूरे का पकडले या कारणावरुन  कागदी यांच्यावर सुरज धुमाळ व त्याचे दोन साथीदाराने कोयता,चाकू व स्टम्पने हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी देत त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून तुला आज खल्लास करून टाकतो अशी धमकी देत पुन्हा त्याच्यावरती वार...

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 604 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली...

Image
  सातारा जिल्ह्यात आज 1 बाधिताची नोंद ... कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 10 सक्रिय रूग्ण असून 3 रूग्णांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. नमूने-चाचणी-101 (एकूण-26 लाख 26 हजार 646) आज बाधित वाढ- 1 (एकूण-2 लाख 80 हजार 758) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 902) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-10 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -3 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 604 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 2 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 8 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 18 हजार 317 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;मोटार सायकल चोरट्यास अटक,1 मोटार सायकल जप्त...

Image
  कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;मोटार सायकल चोरट्यास अटक,1 मोटार सायकल जप्त... कराड दि.30 (प्रतिनिधी) मलकापूर ता.कराड येथून गत आठवड्यात हॉटेल शशीवडेवाले यांचेशेजारील कलश हाईट्स येथून एमएच 11 एक्यु 5830 ही मोटार सायकल चोरी झाल्याची तक्रार शशिकांत दिनकर ढेबे (रा. नांदलापूर) यांनी तक्रार दिलेली होती.त्यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यास 978/2022 भादविसक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ तपास करुन मोटारसायकल चोरट्यास शोधून दूचाकी जप्त केली आहे. मोटार सायकल चोरीबाबत पोलीस कॉन्स्टेबर सुजीत दाभाडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सपोनि अमित बाबर, सफौ रघुवीर देसाई, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे महेश शिंदे, रईस सय्यद यांनी साफळा रचून रेकाॅर्डवरील गुन्हेगार रोहित आखळे यास अटक केली. व त्यांचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त केलेली आहे.  नमुदची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, .उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो...

सायबर फ्रॉड मध्ये गेलेले 88 हजार रुपये पोलीसांच्या प्रयत्नाने व्यापाऱ्यास परत...

Image
  कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;सायबर फ्रॉड मध्ये गेलेले 88 हजार रुपये पोलीसांच्या प्रयत्नामुळे व्यापाऱ्यास परत... कराड दि. 30 (प्रतिनिधी) कराडात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध व्यापार्‍याचा सायबर फ्रॉड हेावून त्यांचे खात्यातील रुपये 88 हजार रुपये गायब झाले हेाते. त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीसात संपर्क केला. व्यापार्‍यांने दिलेल्या माहिती नूसार त्यांनी घर घेणेसाठी कर्ज घेतलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होते. त्यातील 88 हजार रुपये दोन दिवसांपूर्वी गायब झाले होते त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते.  सपोनि अमित बाबर व पोलीस नाईक संजय जाधव यांनी व्यापाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक अमित झेंडे व अजय जाधव यांना संपर्क करून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणेे सायबर पोलीस ठाणे सातारा व कराड शहर पोलीस ठाणेकडील सर्तक पोलिसिंगमुळे सायबर फ्रॉड होवून व्यापाऱ्याचे गेलेले 88 हजार रुपये काल मिळून आले.पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत व्यापाऱ्याने पोलीसांचे आभार माणून खरी दिवाळी भेट पोलीसांचे मदतीतून मिळाल्याचे सांगितले....

कराड नगरपरिषद कर्मचार्‍यांनी साकारला प्रतापगडाचा भव्य किल्ला...

Image
  कराड नगरपरिषद कर्मचार्‍यांनी साकारला प्रतापगडाचा भव्य किल्ला... कराड दि.30 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषद कर्मचार्‍यांनी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात संकलित कचर्‍यातील टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ सूबक कलाकृती व शिल्प बनवलेले अनेकांनी पाहिले आहे.मात्र याहून वेगळी कलाकृती साकारताना कर्मचार्‍यांनी चक्क वेस्ट टू वेल्थ अंतर्गत अतिभव्य प्रतापगडाची हूबेहूब प्रतिकृती साकारली असुन ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.कचर्‍यातील वस्तूपासून सर्वात मोठा प्रतापगड किल्ला बनवून आरोग्य कर्मचार्‍यांनी दिवाळी साजरी करीत निर्संग सवंर्धन, पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर बच्चे कंपनी विविध गड किल्ले साकारत असतात.या ही वर्षी शहरात अनेक ठिकाणी गड किल्ले बनवल्याचे दिसून आले.याच दरम्यान नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील ट्रॅक्टर टीम तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी मिळून रोज संकलित केला जाणार्‍या कचर्‍यातील वस्तू मिळवून प्रतापगडच किल्ला साकरला आहे.प्लास्टिक कागद, विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करुन 30 फूट बाय 30 फूट आकारात तीन फूट ऊंचीचा किल्ला तयार केला आहे.या किल...

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 574 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 1 बाधिताची नोंद ... कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात सातारा तालुक्यात एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 9 सक्रिय रूग्ण असून 3 रूग्णांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत. नमूने-चाचणी-154 (एकूण-26 लाख 26 हजार 545) आज बाधित वाढ- 1 (एकूण-2 लाख 80 हजार 757) आज कोरोनामुक्त- 3 (एकूण-2 लाख 73 हजार 902) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-9 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -3 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 574 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 2 हजार 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 9 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 18 हजार 802 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील...

Image
  माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील... सातारा दि.29 : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे  काम माध्यमांनी करावे असे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022  च्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खा. श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.  पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले. निर्भीड पत्रकारितेसाठी ते गरजे...

कराड अर्बनचे 'सभासद संपर्क अभियान' उत्साहात.....

Image
  कराड अर्बनचे 'सभासद संपर्क अभियान' उत्साहात..... कराड दि.28- सभासद ही बँकेचे मालक आहेत, आम्ही फक्त कारभारी आहोत, मालक व कारभारी यांचा सुसंवाद व्हावा या उद्देशाने बँकेने गेल्या पंधरा दिवसापासून विभागवर सभासद संपर्क व प्रशिक्षण मिळावे आयोजित केले आहेत. यापूर्वी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, दहिवडी, फलटण येथे पार पडलेल्या मेळाव्यांना सुमारे 7000 हून अधिक सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली व या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले हीच आमच्या बँकेच्या उत्तम कारभाराची पोचपावती असल्याचे गौरवोदगार कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी काढले. कराड अर्बन बँकेचा कराड शहर व परिसरातील सभासदांचा संपर्क व प्रशिक्षण मेळावा 21 आॅक्टोंबर रोजी कराड अर्बन बँक शताब्दी हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी बँकेचे माझे अध्यक्ष व जेष्ठ संचालक सभासराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह परिसरातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मेळाव्याच्या प्रास्ताविकामध्ये बोलत असताना बँकेचे मुख्...

देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 208 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली.....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 1 बाधिताची नोंद ... कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात सातारा तालुक्यात एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 6 सक्रिय रूग्ण आहेत.  नमूने-चाचणी-127 (एकूण-26 लाख 26 हजार 391) आज बाधित वाढ- 1 (एकूण-2 लाख 80 हजार 756) आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 73 हजार 899) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-6 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -3 देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 208 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 3 हजार 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 12 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 19 हजार 398 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई....

Image
  राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई.... लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न... दौलतनगर दि.28 :- राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय वेगाने घेत आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीत असलेल्या बळीराजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही या सरकारची भूमिका आहे.नुकतेच कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून भागभांडवल देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.यामध्ये आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा  समावेश असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी  सुमारे सोळा कोटींचे शासकीय भागभांडवल कारखान्यास मिळणार असल्याने राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. दौलतनगर, ता.पाटण येथ...

सातारा जिल्हा पोलीस को.आॅप सोसायटी निवडणूक...

Image
  ना. सत्तेसाठी... ना स्वार्थासाठी... आम्ही लढत आहोत सभासदांच्या लाभासाठी;परिवर्तन सहकार पॅनेलचा कराडात मतदारांशी सवांद... सातारा जिल्हा पोलीस को.आॅप सोसायटी निवडणूक... कराड दि.28-(प्रतिनिधी) सातारा जिल्हा पोलीस कॉ.आॅप लि. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक आठ नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवर्तन सहकार पॅनेलच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारा अंतर्गत आज परिवर्तन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी कराड शहर व तालुका पोलिसांशि संवाद साधून परिवर्तन सहकार पॅनलचा जाहीरनामा व वचननामा याबद्दल त्यांच्याशी सुसंवाद साधला. ना. सत्तेसाठी... ना स्वार्थासाठी... आम्ही लढत आहोत सभासदांच्या लाभासाठी या घोषवाक्यसह परिवर्तन सहकार पॅनेलने आपला जाहीरनामा/वचननामा प्रसिद्ध केला असून यामध्ये सोसायटीची घटना दुरुस्ती करणार, सभासदांच्या कर्जाचा व्याजदर टप्प्याटप्प्याने सात टक्केपर्यंत कमी करणार, गृहखर्ज योजना (25 लाख) चालू करणार करणार. तसेच सभासदांसाठी ठेव योजना चालू करणार आहे सभासदांचे सर्व लाभाऊंश गुणगौरव पुरस्कार सर्वांना रोखीने देणार आहे सभासदांना पैसे भरण्यासाठी वेळ व पैसा अपव्...

कोयना धरण परिसराला भूकपांचा सौम्य धक्का....

Image
  कोयना धरण परिसराला भूकपांचा सौम्य धक्का.... कराड दि.28 (प्रतिनिधी) कोयना धरण परिसराला आज सकाळी साडेसहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 नोंदली गेली आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 8 कि. मी अंतरावर होता.तर हेळवाक गावाच्या नैऋत्येस 5 किलोमीटर अंतरावर नोंदला गेला. हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून कोयनानगर,पोफळी परिसरात हा धक्का जाणवला आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 7 किलोमीटर खोल नोंदली गेली आहे. अशी माहिती उपकरण उपविभाग, कोयनानगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन...

Image
  नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत  होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन... सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय... मुंबई, दि.27- राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 112 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली

Image
  सातारा जिल्ह्यात आज 1 बाधिताची नोंद ... कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात सातारा तालुक्यात एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 19 सक्रिय रूग्ण आहेत.  नमूने-चाचणी-00(एकूण-26 लाख 26 हजार 230) आज बाधित वाढ- 1 (एकूण-2 लाख 80 हजार 755) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 881) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-19 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -0 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 112 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 1 हजार 898 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 1 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 20 हजार 821 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

कराडात लाकडाच्या वखारीला भीषण आग;लाखोंचे नूकसान...

Image
  कराडात लाकडाच्या वखारीला भीषण आग;लाखोंचे नूकसान... कराड दि.27-(प्रतिनिधी) येथिल उर्दू शाळे समोरील लक्ष्मी साॅ मील या लाकडाच्या वखारीला मध्यरात्री आग लागून लाखो रूपयांचे नूकसान झाल्याची घटना घडली असुन कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.मध्यरात्री दोन वाजण्याच्या सूमारास ही आग लागली होती.घटनास्थळी वरिष्ठ पो.नि.बी आर पाटील तसेच एमएसईबीचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले होते. आग लागताच स्थानिकांनी अग्निशामक दल व पोलिसांना याची माहिती दिली.आगीने रौद्ररूप धारण केल्याने कराड नगरपरिषदेच्या दोन्ही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तर सह्याद्री कारखान्याची एक गाडी ही मदतीला आल्याने आग विझवता आली.नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.पोलिस बंदोबस्त ही हजर होता.आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शाॅर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पटेल कुटूंबियांनी सूमारे 45 वर्षापूर्वी या ठिकाणी वखार टाकली होती.त्यांच्यासह या ठिकाणी आणखी काही वखारी जवळ जवळ आहेत.शहरात लाकडाच्या दहा वखारी आहेत.आगीची घटना येथे पहिल्यांदाच घडली असल्याचे सांगण्यात ...

कराडात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्या विविध मान्यवरांच्या भेटी...

Image
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करताना मुकूंद चरेगावकर..... कराडात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्या विविध मान्यवरांच्या भेटी... कराड दि.26 (प्रतिनिधी) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दीपावली पाडवा सणांच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील विविध मान्यवरांच्या घरी भेठी देऊन दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत ही करण्यात आले.भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आठवड्याभरात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून त्या पार्श्वभूमीवर या सदिच्छा भेटींची चर्चा कराड शहरात दिवसभर सुरू होती. आज सकाळी मंत्री पाटील यांनी भाजपा प्रदेश सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांच्या निवासस्थानी प्रथम भेट दिली व सुमारे अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या रुक्मिणी नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तसेच जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्याही निवासस्थानी मंत्री पाटील यांनी भेट दिली मंत्री पाटील यांनी विद्यानगर येथील योगेश जाधव यांच्य...

देशात गेल्या 24 तासांत 830 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली.....

Image
  सातारा जिल्ह्यात आज 4 बाधितांची नोंद ... कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 4 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 18 सक्रिय रूग्ण आहेत.  नमूने-चाचणी-88 (एकूण-26 लाख 26 हजार 230) आज बाधित वाढ- 4 (एकूण-2 लाख 80 हजार 754) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 881) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-18 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -0 देशात गेल्या 24 तासांत 830 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 2 हजार 416 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 1 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 21 हजार 607 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

कराड नजीक वनविभागाच्या टप्यात आलेली मगर निसटली...

Image
  कराड नजीक वनविभागाच्या टप्यात आलेली मगर निसटली... कराड दि.26 (प्रतिनिधी) गत आठवड्यात टेंभू येथे मगरीचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच खोडशी ता. कराड येथे दोन दिवसापूर्वी नदीपत्रातून ओढ्यात आलेली मगर गावातील चौकात दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. सलग दोन दिवस या मगरीने  ओढ्याच्या व पुलापासून पुढील भागात दोन वेळा दर्शन दिल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.आज वन विभागांनी या परिसराचे पहाणी केले असता मगर ही ओढ्यात असल्याचे निदर्शनास आले. आज या मगरीला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र दिवसभर प्रयत्न करूनही मगर पकडण्यात अपयश आले. आज सकाळी वनविभागाने वाइल्डलाइफ ॲम्बुलन्स तसेच रॅपिड रेस्क्यू टीमच्या मदतीने ओढ्यात मगरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे वनविभागाने पोलीस बंदोबस्त मागवला होता. गावचे पोलीस पाटील तसेच सरपंच आदी नागरिकांनीही या मगर पकडण्याच्या मोहिमेत मदत केली. दोन वेळा ही मगर टाकलेल्या फासातून निसटली, तरीही तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू ...

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 994 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली

Image
  सातारा जिल्ह्यात आज 2 बाधितांची नोंद ... कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात कराड-1, फलटण-1 असे 2 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 0 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 18 सक्रिय रूग्ण आहेत.  नमूने-चाचणी-36 (एकूण-26 लाख 26 हजार 142) आज बाधित वाढ- 2 (एकूण-2 लाख 80 हजार 750) आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 73 हजार 881) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724) उपचारार्थ रूग्ण-18 गंभीर रुग्ण--0 रूग्णालयात उपचार -0 देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 994 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 1 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात 23 हजार 193 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद...

Image
  कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद... कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनच्या उपक्रमात ज्ञानदीप संस्थेचा पुढाकार:36 ठिकाणी राबविले जनजागृती कार्यक्रम... कराड, दि.25: कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात बालविवाह प्रथा नष्ट व्हावी या हेतूने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेने सहभागी होत कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कराड तालुक्यात महाविद्यालय परिसरासह वाडीवस्तीपासून विविध गावांमध्ये हे अभियान राबविले. यामध्ये उमेद अभियानातर्गंत असणाऱ्या महिला बचत गटातील महिला, एकात्मिक बालविकास...

कराड शहर पोलीसांची कामगिरी;बाईक चोरट्यास लातुरमधून अटक...

Image
  कराड शहर पोलीसांची कामगिरी;बाईक चोरट्यास लातुरमधून अटक... कराड दि.25 (प्रतिनिधी) कराड मधून मोटार सायकल चोरणार्‍यास मोटार सायकलसह लातूर येथून कराड पोलिनी अटक केली आहे.तसेच 86 हजार रुपये किंमतीची चोरीची मोटार सायकल ही जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की गत महिन्यात दि.21 सप्टेंबर रोजी दत्तशिवम कॉलनी आगाशिवनगर येथून सीबीआर 150 ही मोटार सायकल चोरी झाले बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानूसार कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सपोनि राहूल वरोटे, पो.ना. योगेश भोसले, तानाजी बागल व पो.कॉ. गोविंद माने यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन सबंधित गुन्ह्यात चोरीस गेलेली रुपये 86 हजार रुपये किंमतीची सीबीआर 150 मोटार सायकलसह आरोपी यास शॉपर स्टॉप लाहेाटी कम्पाऊंड सुभाष चौक लातुर येथून ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.  या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश भोसले हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख...

कराडात गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणारे व दहशत माजवणारे जेरबंद

Image
कराड शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी,गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणारे व दहशत माजवणारे आरोपी अटकेत:2 पिस्टल 1 चाकू जप्त...  कराड दि.25 (प्रतिनिधी) कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी रात्री मुजावर कॉलनी परिसरात पिस्टल मधून फायरिंग झाली. त्याबाबत शहारुख मुल्ला यांनी निशिकांत शिंदे व परशुराम करवले यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तक्रार दिलेने कराड शहर पो.ठाणे गुरनं 968/2022 भादविसक 307,504,506,34 सह आर्म ॲक्ट 3,4,25 प्रमाणे दाखल झाला.  सदर गुन्ह्याचे गांर्भिय ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी नमुदचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अमित बाबर यांचेकडे पुढील तपासकामी दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने कौशलपुर्वक तपास करून नमुद गुन्ह्यातील आरोपीत निशिकांत शिंदे यास कराड येथून व तडीपार गुंड परशुराम रमेश करवले यास आटपाडी ता.खानापूर जि.सांगली येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आलेले होते. नमुद गुन्ह्याचे तपासादरम्यान नमुद गुन्ह्...

कलाविष्कार शिबिरातून सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी घेतला कला विकासाचा ध्यास...

Image
  कलाविष्कार शिबिरातून सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी घेतला कला विकासाचा ध्यास... कराड दि.25-जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, कराड येथे शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम अंतर्गत तीन दिवसीय कलाविष्कार २०२२ या निवासी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव अनिल कुलकर्णी, संचालक डॉ.प्रकाश सप्रे, दीपक कुलकर्णी, सुनील मुंद्रावळे, श्रीपाद कुलकर्णी,  सौ. रुपाली तोडकर व सौ.शरयू माटे उद्घाटन समारंभास उपस्थित होते. सर्व संचालक यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या कल्पनेतून शिबिराध्यक्ष दीपक पाटील, स्वागताध्यक्ष सौ.सोनाली जोशी यांच्या नियोजनातून सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या तीन दिवसीय कालावधीत शिबिरात विविध कला विषयाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह, कृतियुक्त सत्रांचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या  दिवशी शाळेचा माझी विद्यार्थी व यशस्वी व्यावसायिक निरंजन सुर्यवंशी यांनी केश रचना या विषयावर प्रात्यक्षिकासह ...