कराड नगरपरिषद कर्मचार्यांनी साकारला प्रतापगडाचा भव्य किल्ला...
कराड नगरपरिषद कर्मचार्यांनी साकारला प्रतापगडाचा भव्य किल्ला...
कराड दि.30 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषद कर्मचार्यांनी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात संकलित कचर्यातील टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ सूबक कलाकृती व शिल्प बनवलेले अनेकांनी पाहिले आहे.मात्र याहून वेगळी कलाकृती साकारताना कर्मचार्यांनी चक्क वेस्ट टू वेल्थ अंतर्गत अतिभव्य प्रतापगडाची हूबेहूब प्रतिकृती साकारली असुन ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.कचर्यातील वस्तूपासून सर्वात मोठा प्रतापगड किल्ला बनवून आरोग्य कर्मचार्यांनी दिवाळी साजरी करीत निर्संग सवंर्धन, पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर बच्चे कंपनी विविध गड किल्ले साकारत असतात.या ही वर्षी शहरात अनेक ठिकाणी गड किल्ले बनवल्याचे दिसून आले.याच दरम्यान नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील ट्रॅक्टर टीम तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी मिळून रोज संकलित केला जाणार्या कचर्यातील वस्तू मिळवून प्रतापगडच किल्ला साकरला आहे.प्लास्टिक कागद, विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करुन 30 फूट बाय 30 फूट आकारात तीन फूट ऊंचीचा किल्ला तयार केला आहे.या किल्ह्यावर छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह,तोफा, बुरूज,झाडी व मावळ्यांनी किल्ला सजवला गेला आहे.किल्ल्याच्या काही भागात हूबेहूब रस्ता ही तयार करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रतापगड किल्ल्याची आरोग्य अभियंता आर.डी.भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे,अग्निशामक दल प्रमुख सौरभ सांळुंखे,वरिष्ठ मुकादम मारूती काटरे यांनी पाहणी करुन कर्मचार्यांचे कौतूक केले.टाऊन हाॅल पाण्याच्या टाकी खालील भागात हा भव्य किल्ला साकारला असुन अनेकजण तो पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.हा किल्ला साकारण्यात मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली रवी काटरे व ट्रॅक्टर टीम, सोनू चव्हाण, किशोर कांबळे, सागर सातपुते, श्रीकांत कांबळे, भास्कर काटरे, अतुल माने, फायर स्टेशन जाधव टीम तसेच सर्व मुकदम यांनी योगदान दिले आहे.
Comments
Post a Comment