सांगोल्यात वारकर्यांच्या पायी दिंडीत कार घुसली;कोल्हापुरातील 7 जणांचा मृत्यू...
सांगोल्यात वारकर्यांच्या पायी दिंडीत कार घुसली;कोल्हापुरातील 7 जणांचा मृत्यू...
सोलापूर दि.31- पंढरपुरला कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे पायी दिंडी निघाली होती. ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथून जात असताना दिंडीत पाठीमागून कार घुसली. यामुळे झालेल्या अपघातात 7 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी 7 वाजता ही पायी दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक MH 13 DE 7938 ही दिंडीत घुसली. वारकऱ्यांना चिरडत कार पुढे जाऊन थांबली. यात आठ वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत कार घुसल्यानंतर समोर आलेल्या प्रत्येकाला चिरडत कार पुढे गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील 32 वारकरी या पायी दिंडीत होते. यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला, 2 पुरुष यांचा समावेश आहे.
यामध्ये शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जैराव जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव हे रा.जाठारवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
Comments
Post a Comment