कराड नजीक वनविभागाच्या टप्यात आलेली मगर निसटली...

 


कराड नजीक वनविभागाच्या टप्यात आलेली मगर निसटली...

कराड दि.26 (प्रतिनिधी) गत आठवड्यात टेंभू येथे मगरीचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच खोडशी ता. कराड येथे दोन दिवसापूर्वी नदीपत्रातून ओढ्यात आलेली मगर गावातील चौकात दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. सलग दोन दिवस या मगरीने  ओढ्याच्या व पुलापासून पुढील भागात दोन वेळा दर्शन दिल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.आज वन विभागांनी या परिसराचे पहाणी केले असता मगर ही ओढ्यात असल्याचे निदर्शनास आले. आज या मगरीला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र दिवसभर प्रयत्न करूनही मगर पकडण्यात अपयश आले.

आज सकाळी वनविभागाने वाइल्डलाइफ ॲम्बुलन्स तसेच रॅपिड रेस्क्यू टीमच्या मदतीने ओढ्यात मगरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे वनविभागाने पोलीस बंदोबस्त मागवला होता. गावचे पोलीस पाटील तसेच सरपंच आदी नागरिकांनीही या मगर पकडण्याच्या मोहिमेत मदत केली. दोन वेळा ही मगर टाकलेल्या फासातून निसटली, तरीही तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.ओढ्यात गाळ व गर्द झाडी असल्याने मगर इकडून तिकडे ये-जा करीत होती. सायंकाळ पर्यंत पुन्हा प्रयत्न करण्यात आला मात्र टप्प्यात आलेली मगरीने पुन्हा एकदा या टीमला चकवा दिला.

काल सायंकाळी अनेकांना या मगरीचे ओढ्यावरील मोकळ्या जागेत दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने व वन विभागाने ओढ्यावरील पुलावर लाईटची व्यवस्था केली आहे व बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. उद्याही ही मगर पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान या मगरीला रात्री उशिरा वनविभागाने जेरबंद केले आहे.ही मगर पंधरा ते वीस फूटाच्या ओढ्यातील जागेत वनविभागाला चकवा देत होती.दिवसभरातील तीन प्रयत्नानंतर रात्री केलेल्या प्रयत्नामुळे मगर सापळ्यात आडकली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक