कोयना धरण परिसराला भूकपांचा सौम्य धक्का....
कोयना धरण परिसराला भूकपांचा सौम्य धक्का....
कराड दि.28 (प्रतिनिधी) कोयना धरण परिसराला आज सकाळी साडेसहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 नोंदली गेली आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 8 कि. मी अंतरावर होता.तर हेळवाक गावाच्या नैऋत्येस 5 किलोमीटर अंतरावर नोंदला गेला. हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून कोयनानगर,पोफळी परिसरात हा धक्का जाणवला आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 7 किलोमीटर खोल नोंदली गेली आहे. अशी माहिती उपकरण उपविभाग, कोयनानगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment