कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;मोटार सायकल चोरट्यास अटक,1 मोटार सायकल जप्त...
कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;मोटार सायकल चोरट्यास अटक,1 मोटार सायकल जप्त...
कराड दि.30 (प्रतिनिधी) मलकापूर ता.कराड येथून गत आठवड्यात हॉटेल शशीवडेवाले यांचेशेजारील कलश हाईट्स येथून एमएच 11 एक्यु 5830 ही मोटार सायकल चोरी झाल्याची तक्रार शशिकांत दिनकर ढेबे (रा. नांदलापूर) यांनी तक्रार दिलेली होती.त्यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यास 978/2022 भादविसक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ तपास करुन मोटारसायकल चोरट्यास शोधून दूचाकी जप्त केली आहे.
मोटार सायकल चोरीबाबत पोलीस कॉन्स्टेबर सुजीत दाभाडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सपोनि अमित बाबर, सफौ रघुवीर देसाई, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे महेश शिंदे, रईस सय्यद यांनी साफळा रचून रेकाॅर्डवरील गुन्हेगार रोहित आखळे यास अटक केली. व त्यांचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त केलेली आहे.
नमुदची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, .उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, सफौ रघुवीर देसाई, पोलीस हवालदार प्रफुल्ल गाडे, महेश शिंदे, रईस सय्यद यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment