कराडच्या रिक्षा चालकावर विद्यानगरमध्ये कोयता-चाकूने हल्ला...
कराडच्या रिक्षा चालकावर विद्यानगरमध्ये कोयता-चाकूने हल्ला...
कराड दि.31 (प्रतिनिधी) विद्यानगर येथे भर वस्तीत कराड शहरातील एका रिक्षा चालकावर तीन जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी विद्यानगर येथिल होली फॅमिली स्कूल नजीक घडल्याने त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली होती, त्याचा परिणाम म्हणून कराडत ही मंडई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वरिष्ठ पो.नि.बी.आर.पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त या परिसरात तैनात केला होता. हल्लेखोर फरार झाले असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की काल आयुब दिलावर कागदी (वय 39) रा. गूरुवार पेठ हा रिक्षातून भाडे घेऊन होली फॅमिली या ठिकाणी गेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी बबलू माने (आबा) याचा मुलगा शिवराज माने याचे गचूरे का पकडले या कारणावरुन कागदी यांच्यावर सुरज धुमाळ व त्याचे दोन साथीदाराने कोयता,चाकू व स्टम्पने हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी देत त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून तुला आज खल्लास करून टाकतो अशी धमकी देत पुन्हा त्याच्यावरती वार केल्याने तो जखमी झाला. त्यास तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस स्टेशन रात्री उशिरा झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment