कराड अर्बनचे 'सभासद संपर्क अभियान' उत्साहात.....
कराड अर्बनचे 'सभासद संपर्क अभियान' उत्साहात.....
कराड दि.28- सभासद ही बँकेचे मालक आहेत, आम्ही फक्त कारभारी आहोत, मालक व कारभारी यांचा सुसंवाद व्हावा या उद्देशाने बँकेने गेल्या पंधरा दिवसापासून विभागवर सभासद संपर्क व प्रशिक्षण मिळावे आयोजित केले आहेत. यापूर्वी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, दहिवडी, फलटण येथे पार पडलेल्या मेळाव्यांना सुमारे 7000 हून अधिक सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली व या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले हीच आमच्या बँकेच्या उत्तम कारभाराची पोचपावती असल्याचे गौरवोदगार कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी काढले.
कराड अर्बन बँकेचा कराड शहर व परिसरातील सभासदांचा संपर्क व प्रशिक्षण मेळावा 21 आॅक्टोंबर रोजी कराड अर्बन बँक शताब्दी हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी बँकेचे माझे अध्यक्ष व जेष्ठ संचालक सभासराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह परिसरातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
मेळाव्याच्या प्रास्ताविकामध्ये बोलत असताना बँकेचे मुख्य कार्य अधिकारी सीए. दिलीप गुरु यांनी बँकेने नुकत्याच पार पडलेल्या 105 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना 5% लाभांश दिला आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या शतकोत्तर वाटचालीचे साक्षीदार असणाऱ्या आपल्या सर्व सभासदांना दीपावलीची औचित्य साधून भेटवस्तू दिली असून त्याचे वाटप शाखाद्वारे सुरू करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच ज्या सभासदांची भागधारणा रक्कम रुपये अडीच हजार पेक्षा कमी आहे त्या सभासदांनी किमान अडीच हजार रुपयांचे भागधारणा करणे आवश्यक आहे तसेच ज्या सभासदांचे बँकिंग व्यवहार सुरू नाहीत अशा सभासदांनी बँकिंग व्यवहार सुरू ठेवावीत व बँकेच्या यशस्वी वाटचालीत आपलाही सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी केले आहे.
अध्यक्ष डॉ. सुभाष एरम सभासदांना संबोधित करताना म्हणाले, बँक मार्च 2023 पर्यंत नेट बँकिंगची सेवा उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. यासाठी लागणारी सर्व अध्यायवत यंत्रणा बँकेकडे उपलब्ध आहे. बँक नेट बँकिंग संदर्भात रिझर्व बॅंकेकडे प्रस्ताव पाठवीत असून रिझर्व बँकेकडून मान्यता मिळाल्यानंतर नेट बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे. बँकेने नुकताच 4500 कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केला असून सर्व सभासदांनी आवश्यक भागधारण करून बँकेकडे व्यवहार सुरू ठेवावेत व बँकेच्या व्यवसाय वाढीमध्ये सहभाग नोंदवण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
बँक मोठी होण्यामध्ये सभासदांचा मोठा वाटा आहे. कराड अर्बन बँक सभासदांना फक्त आर्थिक पद पुरवठा करत नाही तर योग्य सल्ला देऊन आर्थिक शिस्त लावते. यामुळेच सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धोरणात्मक दृष्टी बँक प्रशासनाकडे असल्यामुळे सभासद बँकेवर खुश आहेत, असे उदगार माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी काढले. यापुढे ते म्हणाले, सहकार क्षेत्रात आदर्श घालणाऱ्या कराड बँक अर्बन बँकेने आज अखेर राजकारण विरहित समाजकारण व अर्थकारण केले आहे. यामुळेच बँक आज सक्षम आहे. सहकारात असलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीपासून कराड अर्बन बँक नेहमीच चार हात लांब राहिली आहे, कारण येथे काम करणारे सेवक, संचालक मंडळ हे निस्वार्थे आहेत, यामुळेच त्यांना सभासदांचे नेहमीच प्रेम मिळते. बँकेस दहा हजार कोटींचा टप्पा पार करावयाचा असून यासाठी सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याची अपेक्षा माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी सभासदांकडून व्यक्त केली.
तसेच बँकेचा सभासदांशी संपर्क सूलभ पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक शाखेमध्ये सभासदांसाठी एक विहित नमुन्या मधील फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये सभासदांनी स्वतःची अद्यावत माहिती भरून द्यावी जेणे करून या पुढील काळात बँकेत सभासदांशी संपर्क करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व आपला सभासदत्वाची माहिती बँकेकडे अद्यावत होईल. यामुळे सर्व सभासदांनी आपले व्यवहार असलेल्या शाखेमध्ये भेटवस्तू घेत असताना सदरचा फॉर्म भरून सहकार्य करावे असे आवाहन अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी यावेळी केले.
बँकेने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे कराड अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. बँकेने कोरोना काळात केलेल्या ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अनेक सभासद व त्यांच्या नातेवाईकासाठी संजीवनी ठरली आहे. कै.डाॅ.द.शि. एरम (बाबा) व सुभाषराव जोशी (भाऊ) यांनी 40 वर्षापूर्वी घातलेल्या शिस्तबद्ध कारभारामुळे अर्बन संस्कृती उदयास आली आहे. या अर्बन संस्कृतीचे आकलन सहकार क्षेत्रामध्ये केले जात असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.
सभासद संपर्क व प्रशिक्षण मेळाव्यात सभासदांनी त्यांच्या मनोगतातून बँकेच्या ग्राहक सेवा, पतपुरवठा धोरण, आर्थिक सल्ला व मार्गदर्शन, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारे सेवा बाबत समाधान व्यक्त केले व बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सदरच्या मेळाव्यामध्ये बँकेने कराड शहर व परिसरातील शाखांमधील 25 सभासदांना प्रतिनिधिक स्वरूपात भेटवस्तूची वाटप केले. याचप्रमाणे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, दहिवडी, फलटण येथील मेळाव्यामध्ये सुद्धा सभासदांना प्रातनिधिक स्वरूपात भेटवस्तूची वाटप केले व विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या सभासद अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा प्रोत्साहनपर सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. महाव्यवस्थापक गिरीश सिंहासने यांनी सूत्रसंचालन व उपमहाव्यवस्थापक सविता लातूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सभासदांसाठी स्नेहभोजनाच्या आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
कराड अर्बन संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध..
दि.कराड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कराडची संचालक मंडळ सन 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणूक सातारा जिल्हा निबंधक मनोहर माळी यांनी नुकतीच बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची घोषणा केली.गटनिहाय नवनियुक्त संचालक मंडळ खालील प्रमाणे
सर्वसाधारण गट (12)- सुभाष रामचंद्र जोशी, सुभाष शिवराम एरम, समीर सुभाष जोशी, स्वानंद प्रवीण पाठक, श्रीरंग गणेश ज्ञानसागर, महिपती निवृत्ती ठोके, विजय कोंडीबा चव्हाण, विनीत चंद्रकांत एरम, अनिल अप्पासाहेब बोधे, चंद्रकुमार शंकरराव डांगे, महादेव गणपती शिंदे, राहुल अरुण फासे.
महिला राखीव गट (2)-रश्मी सुभाष एरम, सुनिता दिलीप जाधव,
अनुसूचित जाती/ जमाती राखीव गट (1)- राजेश विश्वनाथ खराटे.
वि.जा.भ.ज./ वि.मा. प्र राखीव गट (1)-राजेंद्र नारायण कुंडले. इतर मागासवर्ग राखीव गट (1) शशांक अच्युतराव पालकर. या नूतन संचालक मंडळात सभासद व ग्राहकाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments
Post a Comment