सातारा जिल्हा पोलीस को.आॅप सोसायटी निवडणूक...

 

ना. सत्तेसाठी... ना स्वार्थासाठी... आम्ही लढत आहोत सभासदांच्या लाभासाठी;परिवर्तन सहकार पॅनेलचा कराडात मतदारांशी सवांद...

सातारा जिल्हा पोलीस को.आॅप सोसायटी निवडणूक...

कराड दि.28-(प्रतिनिधी) सातारा जिल्हा पोलीस कॉ.आॅप लि. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक आठ नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवर्तन सहकार पॅनेलच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारा अंतर्गत आज परिवर्तन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी कराड शहर व तालुका पोलिसांशि संवाद साधून परिवर्तन सहकार पॅनलचा जाहीरनामा व वचननामा याबद्दल त्यांच्याशी सुसंवाद साधला.

ना. सत्तेसाठी... ना स्वार्थासाठी... आम्ही लढत आहोत सभासदांच्या लाभासाठी या घोषवाक्यसह परिवर्तन सहकार पॅनेलने आपला जाहीरनामा/वचननामा प्रसिद्ध केला असून यामध्ये सोसायटीची घटना दुरुस्ती करणार, सभासदांच्या कर्जाचा व्याजदर टप्प्याटप्प्याने सात टक्केपर्यंत कमी करणार, गृहखर्ज योजना (25 लाख) चालू करणार करणार. तसेच सभासदांसाठी ठेव योजना चालू करणार आहे सभासदांचे सर्व लाभाऊंश गुणगौरव पुरस्कार सर्वांना रोखीने देणार आहे सभासदांना पैसे भरण्यासाठी वेळ व पैसा अपव्यात टाळण्यासाठी ची प्रक्रिया सुलभ करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हंटले आहे.

सभासदांना तातडीची कर्ज विनाअट त्याच दिवशी देणार असल्याचे या वचननाम्यात नमूद करण्यात आले असुन सभासदास शेअर्स रक्कम ऐच्छिक करणार (म्हणजे पगारातून कपात एकच राहणार, ज्यांना जास्त ठेवायची आहे त्यांची सोसायटी कार्यालयात स्वीकारण्यात येणार). सभासदांसाठी जुने नवे कर्ज योजना नियमाप्रमाणे सुरू करणार आहे. सभासदांसाठी नवीन निर्णय, योजना, विकास काम करायचे असल्यास सर्व सभासदांना विश्वासात घेऊन सर्वानुमते निर्णय घेणार आहे. सभासद ज्या दिवशी सेवानिवृत्त होत आहे त्याच दिवशी सोसायटी त्यास त्यांचे रकमेचे चेक देणार व ज्यांना सभासदत्व पुढे चालू ठेवण्याचे आहे त्यांचे नियमाप्रमाणे पुढे चालू ठेवणार आहे. सभासदाचे सेवानिवृत्त दिवशी त्यांचे पती-पत्नीस पर्यटनासाठी सोसायटीमार्फत (दहा वर्षे सभासदत्व आवश्यक) पाच हजार रुपये देणार आहे. सोसायटीचा सर्वच कारभार पारदर्शक व संगणकीकरण करणार आहे. सोसायटी सर्व खर्चात काटकसर करणार आहे असेही या जाहीरनामा वचननाम्यात म्हटले आहे.

कर्जदार सभासद मयत झाल्यास कर्ज रक्कम 100% माफ करणार आहे सभासद मयत झाल्यास वारसाला सोसायटी मार्फत 60 हजार रूपयांची तात्काळ मदत करणार असून सभासदास जिव्हाळ्याची व आपुलकीची नम्र वागणूक देणार असून सभासदांसाठी सूचनापेटी ठेवणार आहे व प्रत्येक सूचनेचा विचार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्व खातेदारांची खाते उघडून रकमेची तत्पर सेवा देणार असल्याचे व खातेदारांना विम्याचा फायदा मिळवून देणार असल्याचे या वचनाम्यात म्हटले आहे.

या सातारा जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या निवडणुकीत परिवर्तन सहकार पॅनल मधून सर्वसाधारण गटात आनंदराव मधुकर भोईटे, संजय पांडुरंग जाधव, कांतीलाल चिमाजी नवघणे, सनी सुरेश आवटे, अविनाश आनंद चव्हाण, ओमकार अंकुश यादव, ऋतुराज वसंत शिंदे, पृथ्वीराज भरत जाधव,अतुल जगन्नाथ कूंभार, संग्राम शशिकांत फडतरे हे उमेदवार उभे आहेत. तर इतर मागासवर्गीय राखीव गटातून विनोद मोहन गायकवाड व भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव गटातून मोहन लक्ष्मण नाचण तसेच अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून अनिल जगन्नाथ पवार व महिलांसाठी राखीव असणाऱ्या गटातून जयश्री सुभाष कदम आणि अनिता संदीप हिरवे हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन परिवर्तन सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक