सायबर फ्रॉड मध्ये गेलेले 88 हजार रुपये पोलीसांच्या प्रयत्नाने व्यापाऱ्यास परत...
कराड शहर पोलीसांची सातत्यपुर्ण कामगिरी;सायबर फ्रॉड मध्ये गेलेले 88 हजार रुपये पोलीसांच्या प्रयत्नामुळे व्यापाऱ्यास परत...
कराड दि. 30 (प्रतिनिधी) कराडात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध व्यापार्याचा सायबर फ्रॉड हेावून त्यांचे खात्यातील रुपये 88 हजार रुपये गायब झाले हेाते. त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीसात संपर्क केला. व्यापार्यांने दिलेल्या माहिती नूसार त्यांनी घर घेणेसाठी कर्ज घेतलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होते. त्यातील 88 हजार रुपये दोन दिवसांपूर्वी गायब झाले होते त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते.
सपोनि अमित बाबर व पोलीस नाईक संजय जाधव यांनी व्यापाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक अमित झेंडे व अजय जाधव यांना संपर्क करून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणेे सायबर पोलीस ठाणे सातारा व कराड शहर पोलीस ठाणेकडील सर्तक पोलिसिंगमुळे सायबर फ्रॉड होवून व्यापाऱ्याचे गेलेले 88 हजार रुपये काल मिळून आले.पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत व्यापाऱ्याने पोलीसांचे आभार माणून खरी दिवाळी भेट पोलीसांचे मदतीतून मिळाल्याचे सांगितले.
सायबर क्राईम बाबत नागरीकांनी जागरुक राहणे बाबत पोलीसांनी आवाहन केले आहे. कारण जागृकता हाच एकमेव प्रतिबंधक उपाय आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, पोलीस हवालदार संजय जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित झेंडे व अजय जाधव यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment