कराडात लाकडाच्या वखारीला भीषण आग;लाखोंचे नूकसान...
कराडात लाकडाच्या वखारीला भीषण आग;लाखोंचे नूकसान...
कराड दि.27-(प्रतिनिधी) येथिल उर्दू शाळे समोरील लक्ष्मी साॅ मील या लाकडाच्या वखारीला मध्यरात्री आग लागून लाखो रूपयांचे नूकसान झाल्याची घटना घडली असुन कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.मध्यरात्री दोन वाजण्याच्या सूमारास ही आग लागली होती.घटनास्थळी वरिष्ठ पो.नि.बी आर पाटील तसेच एमएसईबीचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले होते.
आग लागताच स्थानिकांनी अग्निशामक दल व पोलिसांना याची माहिती दिली.आगीने रौद्ररूप धारण केल्याने कराड नगरपरिषदेच्या दोन्ही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तर सह्याद्री कारखान्याची एक गाडी ही मदतीला आल्याने आग विझवता आली.नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.पोलिस बंदोबस्त ही हजर होता.आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शाॅर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पटेल कुटूंबियांनी सूमारे 45 वर्षापूर्वी या ठिकाणी वखार टाकली होती.त्यांच्यासह या ठिकाणी आणखी काही वखारी जवळ जवळ आहेत.शहरात लाकडाच्या दहा वखारी आहेत.आगीची घटना येथे पहिल्यांदाच घडली असल्याचे सांगण्यात येते.या वखारी शेजारी विद्दूत पोलवर ट्रान्सफाॅर्मर असल्याने वीज कर्मचार्यांनी तात्काळ वीज पूरवठा बंद केल्याने मोठी दूघर्टना टळली.
Comments
Post a Comment